मुंबई - पोलिसांच्या खासगी वाहनांवर पोलिसांचे बोधचिन्ह किंवा ‘पोलिस’ असे लिहिणे बेकायदेशीर असून असे लिहिणाऱ्या पोलिसांवर कडक कारवाई करा, असे निर्देश राज्य सरकारने पोलिस महासंचालकांना दिले आहेत.
गृह विभागाने ७ सप्टेंबर रोजी परिपत्रक काढले आहे. पोलिसांकडून खासगी वाहनांवर पोलिस खात्याचे बोधचिन्ह आणि ‘पोलिस’ अशी नेमप्लेट सर्रास लिहिली जात असल्याच्या असंख्य तक्रारी राज्य सरकारकडे आल्या आहेत. त्यामुळे राज्यातील पोलिसांनी त्यांच्या खासगी वाहनांवर असे लिहू नये, अशा कडक सूचना द्याव्यात आणि सूचना देऊनही असे लिहिलेले आढळल्यास अशा पोलिसांवर कठोर कायदेशीर कारवाई करा, असे या परिपत्रकात म्हटले आहे. त्यामुळे पोलिस महासंचालकांनी संबंधितांना सक्त ताकीद दिला आहे.