आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

छायाचित्रकार जगदीश माळी यांचे निधन

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - मेगास्टार अमिताभ बच्चन, करिना कपूर यांच्यासह बॉलीवूडमधील अनेक तारे-तारकांना वेगळ्या पद्धतीने कॅमेर्‍यात कैद करणारे ज्येष्ठ छायाचित्रकार जगदीश माळी (60) यांचे यकृताच्या दीर्घ आजाराने सोमवारी नानावटी रुग्णालयात सोमवारी निधन झाले. अभिनेत्री अंतरा हिचे ते वडील होत. त्यांच्या पार्थिवावर सायंकाळी 6 वाजता शिवाजी पार्क स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.

गेल्या आठवड्यात पाय घसरून ते पडले होते. त्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. यकृताच्या आजाराबरोबर त्यांना मधुमेह होता. त्यामुळे शस्त्रक्रिया करण्यात अडचण येत होती, अशी माहिती त्यांचे मित्र मिलिंद गुणाजी यांनी दिली. गेल्या काही वर्षांपासून आर्थिक अडचणीत सापडल्याने ते मानसिक तणावाखाली होते. तसेच मुलगी अंतराने त्यांच्याशी संबंध तोडल्याची चर्चा बॉलीवूडमध्ये होती. मात्र, गुणाजी यांनी याचे खंडन केले. जानेवारी महिन्यात माळी यांना भिकार्‍यासोबत अभिनेत्री मिंक बरार हिने पाहिले होते. त्यानंतर तिने अंतराला याबाबत माहिती दिली होती.