आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रस्ते अपघातात तासाला 17 जणांचा मृत्यू, महाराष्ट्र अपघातांमध्ये तिसऱ्या क्रमांकावर

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- रस्तेमार्गपरिवहन मंत्रालयाने बुधवारी ‘रोड अॅक्सिडेंट इन इंडिया २०१६’ अहवाल जारी केला. त्यानुसार गेल्या ११ वर्षांत (२००५-१५) रस्ते अपघात ९.४२ टक्क्यांनी वाढले. मृतांचा आकडे त्याहीपेक्षा सहापट म्हणजे ५८.७७% टक्क्यांनी वाढला आहे. गतवर्षी देशात दररोज सरासरी १३१७ रस्ते अपघात झाले, त्यात ४१३ जणांचा मृत्यू झाला. म्हणजेच तासाला १७ मृत्यू. गतवर्षी एकूण १.५ लाखांपेक्षा जास्त लोकांचा रस्ते अपघातात मृत्यू झाला. ४.९४ लाख लोक जखमी झाले. गतवर्षीच्या लाख ८०,६५२ रस्ते अपघातांत सीट बेल्ट लावल्याने ५,६३८ दुर्घटना झाल्या. ५२,५०० दुचाकी अपघातात हेल्मेट घालणे वा योग्य पद्धतीने लावल्यामुळे सर्वाधिक १०,१३५ (१९.३%) दुचाकीस्वारांनी प्राण गमावले. 
 
 
मुंबईतले ड्रायव्हर्स लेन शिस्तीबाबत चांगले
मुंबईतले ड्रायव्हर्स हे लेन शिस्तीबाबत चांगले आहेत असे वक्तव्य त्यांनी केले. महाराष्ट्र रस्ते अपघातात तिसऱ्या नंबरवर असला तरी अपघाताचं प्रमाण वेगाने कमी करणाऱ्या राज्यांतही महाराष्ट्राचा समावेश होतो, असेही त्यांनी नमूद केले.
 
तासाला 17 जणांचा अपघातात मृत्यू
भारतात एका तासाला 55 अपघात म्हणजे जवळपास मिनिटाला एक अपघात होतो, ज्यात तासाला 17 जण मृत्यूमुखी पडत आहेत. हे भयाण वास्तवही त्यांनी सांगितले. अपघातांचे प्रमाण 4.1 टक्क्यांनी कमी झाले आहे, मात्र मृत्यूमुखी पडलेल्यांची संख्या 3.2 टक्क्यांनी वाढलेली आहे. हे आकडे समाधानकारक नसल्याची कबुलीही खुद्द केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी दिली.
 
हेल्मेट न घातल्यामुळे मोबाईलमुळेही होतात दुचाकीस्वारांचे मृत्यू
दुचाकीच्या अपघातात वर्षभरात जे 52,500 मृत्यू झाले आहेत त्यापैकी 10135 मृत्यू केवळ हेल्मेट न घातल्यामुळे झाले. शिवाय गाडी चालवताना मोबाईलवर बोलल्याने वर्षभरात 2138 लोकांना जीव गमवावा लागला. या मानवी चुकांसह रस्त्यांचं चुकीचं डिझाईन, ज्यात कधी बायपास, योग्य ठिकाणी रस्ते ओलांडण्याची सुविधा नसणं या गोष्टींचाही समावेश असल्याची कबुली गडकरींनी दिली. मोटार वाहन कायद्यात वाहतुकीची शिस्त न पाळल्यास मोठ्या दंडाची तरतूद असल्याने हे विधेयक तातडीने मंजूर झाल्यासही रस्ते वाहतुकीतल्या अपघातांची संख्या कमी होईल असा दावा गडकरींनी केला आहे. सर्वाधिक रस्ते अपघातात उत्तर प्रदेश पहिल्या, तामिळनाडू दुसऱ्या आणि महाराष्ट्र तिसऱ्या नंबर आहे. 
 
पुढील स्लाईडवर पाहा आणखी फोटो आणि माहिती
बातम्या आणखी आहेत...