आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वन कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेसाठी ‘रेस्क्यू बाइक’

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - जंगलात गस्त घालताना, जखमी वन्यप्राण्यांना जंगलात सुरक्षितपणे सोडताना वन कर्मचाऱ्यांना अनेक अाव्हानांना सामाेरे जावे लागते. या प्राण्यांकडून कर्मचाऱ्यांवर हल्ल्याचे प्रकारही यापूर्वी घडलेले अाहेत. असे प्रकार टाळण्यासाठी राज्य सरकारने दाेन रेस्क्यू बाइक बुधवारी राज्यपाल सी. विद्यासागर राव यांच्या हस्ते वन विभागास सुपूर्द केल्या. या वेळी वनमंत्री सुधीर मुनगंटीवारही उपस्थित हाेते.

माय व्हेट चॅरिटेबल ट्रस्टच्या डॉ. मधुरिता गुप्ता यांनी या रेस्क्यू बाइक्सची निर्मिती केली असून त्याचे पेटंटही घेतले अाहे. टाटा ट्रस्टनेही या बाइकच्या निर्मितीसाठी अर्थसाह्य केले अाहे. अशा अाणखी ६८ रेस्क्यू बाइक्स लवकरच वन विभागाच्या ताफ्यात येणार अाहेत. जंगलात छोट्या रस्त्यांवर मोठे वाहन नेणे कठीण होते. अशा वेळी या रेस्क्यू बाइक अगदी वन्य प्राण्यांजवळ जाऊन त्यांच्यावर उपचार करू शकतात. त्यामुळे वन्यजीव आणि वनसंरक्षक या दोघांनाही सुरक्षितता मिळू शकेल, असा विश्वास मुनगंटीवार यांनी व्यक्त केला.
दुचाकीची वैशिष्ट्ये
- या दोनआसनी बाइकच्या मदतीने वन्य प्राण्याला जवळ मदत करता येईल किंवा बेशुद्ध करून त्यावर नियंत्रणही मिळवता येईल.
-जंगल, राष्ट्रीय उद्यानातील वन्य प्राण्यांचे सर्वेक्षण तसेच संनियंत्रण करण्यासाठी उपयाेग.
- या दुचाकींना सर्व बाजूंनी लोखंडी जाळी बसवली आहे. त्यामुळे वन्य प्राण्यांच्या हल्ल्यांपासून संरक्षण मिळेल. तसेच ३६० अंशामध्ये प्राण्यांचे निरीक्षण करता येईल.
- या दुचाकींना चारही बाजूंनी एलईडी दिव्यांची व्यवस्था आहे. जंगलात गस्त घालताना त्याचा उपयाेग हाेईल.
- या दुचाकीत डार्टगन, पाण्याची बाटली, औषधाची किट, ब्लो पाइप, दोरखंड ठेवण्याची व्यवस्था आहे.