आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Rescue Operation At War Level Going On In Mumbai

PHOTOS: शर्थीचे प्रयत्‍न, असे सुरु आहे मुंबईत इमारत पडल्‍यानंतर बचावकार्य

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

डॉकयार्ड रोड (पूर्व) परिसरात असलेल्या महापालिकेच्या वसाहतीतील (बीएमसी कॉलनी) एक पाच मजली इमारत आज (शुक्रवारी) सकाळी सव्वा सहा वाजेच्या सुमारास कोसळली. यात आतापर्यंत सहा मृत्यू झाल्याचे वृत्त आहे. दुर्घटनाग्रस्त इमारतीत बीएमसीचे कर्मचारी राहत होते. अग्निशमन दलाच्या 12 गाड्या घटनास्थळी पोहचल्या असून बचावकार्य युद्धपातळीवर सुरु आहे. अनेक जण ढिगार्‍याखाली अडकल्याची भीती वर्तवली जात आहे. आतापर्यंत 39 जखमींना बाहेर काढण्‍यात यश आले आहे. अनेक लहान मुलांनाही वाचविले आहे.

मिळालेल्‍या माहितीनुसार, एका 12 वर्षीय मुलासह एक वरिष्‍ठ महिलेचा मृत्‍यू झाला आहे. नीला चावडा असे तिचे नाव आहे. बवाचकार्यात राष्‍ट्रीय आपात्‍कालीन बचाव प‍थकाचे जवान पोहोचले आहेत. त्‍यांनी 110 जण ढिगा-याखाली अडकल्‍याची भीती व्‍यक्त केली आहे. बचावकार्य युद्धपातळीवर सुरु आहे.

पुढील स्‍लाईड्समध्‍ये पाहा कसे सुरु आहे बचावकार्य...