आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लोक याला समजत होते पर्वतावर राहणारा दानव, संशोधनात समोर आले हे सत्य

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
संग्रहित फोटो. - Divya Marathi
संग्रहित फोटो.

मुंबई- आशिया खंडातील पर्वतावर राहणाऱ्या मोठ्या जीवाला येती किंवा हिममानव म्हटले जाते. विशेषत: हिवाळ्यात येती पाहण्यासाठी अनेक जण जात असतात. तर काही जण हिममानवाचे ठसे सापडल्याचा दावाही करतात. पण सत्य हे आहे की हा जीव हिममानव नाही. 

 

याबाबत संशोधकांनी सांगितले हे सत्य?
- वैज्ञानिक आणि संशोधकांनी हा जीव म्हणजे अस्वल असल्याचे म्हटले आहे. हे अस्वल आशियातील काळे अस्वल, तिबेटमधील ब्राऊन किंवा हिमालयीन ब्राऊन अस्वलाचेच एक रुप आहे. संशोधकांनी याला येती हे नाव दिले आहे. यूनिवर्सिटी ऑफ बेफेलो कॉलेज ऑफ आर्टस अॅन्ड सायन्सचे प्रोफेसर कार्लोट लिंक्लिस्ट यांनी याबाबतची माहिती दिली.
- त्यांनी सांगितले की, या प्राण्याची हाडे, दात, त्वचा याचा अभ्यास केल्यावर हा प्राणी म्हणजे अस्वलच असल्याचे स्पष्ट झाले आहे. जगभरात या प्राण्याच्या अवशेषांचाही यासाठी अभ्यास करण्यात आला. 

- वैज्ञानिकांच्या मते हिमालयात असलेल्या या अस्वलात काळानुसार बदल होत गेले. उंच ठिकाणी राहत असल्याने व अन्नाचा तुटवडा असल्याने या अस्वलांना अन्नासाठी खूपच पायपीट करावी लागत असेल. त्यामुळे कधीकधी हे दोनच पायांचा वापर करत असावेत. तो दोन पायावर उभा राहत असल्यानेच लोक त्याला हिममानव समजु लागले.

 

पुढील स्लाईडवर आणखी फोटो

बातम्या आणखी आहेत...