आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अारक्षणाआधारे मिळालेली पदाेन्नती कायम राहणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- मागासवर्गीय कर्मचाऱ्यांचे पदोन्नतीमधील आरक्षण रद्द करण्यासंदर्भात उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयाला तीन महिन्यांसाठी स्थगिती मागण्यात आली असून यादरम्यान सर्वोच्च न्यायालयात यासंदर्भात राज्याची बाजू मांडण्यासाठी देशाचे महान्यायवादी किंवा नामांकीत वकील यांची नियुक्ती करण्यात येईल. तसेच यापूर्वी ज्यांना आरक्षणाद्वारे पदोन्नती मिळाली आहे. असे सर्व अधिकारी-कर्मचारी यांची पदे अवनत होऊ नयेत यासाठी अध्यादेश काढण्याचा पर्याय विधी व न्याय विभागाशी चर्चा करून पडताळून पाहण्यात येईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी विधान परिषदेत सांगितले. सुमारे १३ हजार अधिकारी-कर्मचाऱ्यांना यामुळे दिलासा मिळेल. सुनील तटकरे यांनी यासंदर्भात चर्चा करावी असा प्रस्ताव दिला होता. हायकोर्टाच्या निर्णयासंदर्भात सरकारने त्वरित पावले उचलावीत अन्यथा प्रशासन कोसळून पडेल, असा इशारा तटकरे यांनी दिला.

६०५ अभ्यासक्रमांची यादी लवकरच पटलावर : मुख्यमंत्री
ज्या ६०५ अभ्यासक्रमांसाठी अाेबीसींना शिष्यवृत्ती देण्यात येते. त्या सर्व अभ्यासक्रमांचा समावेश आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांना देण्यात येणार अाहे. या अभ्यासक्रमांची यादी  व मराठा समाजाच्या मागण्यांसंदर्भातील शासनाने घेतलेल्या सर्व निर्णयांची एकत्रित यादी स्वतंत्रपणे पटलावर ठेवण्यात येईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

शिष्यवृत्तीसाठी ५० % गुणांची अट यंदापासूनच  : तावडे
राजर्षी छत्रपती शाहू महाराज शिक्षण शुल्क शिष्यवृत्ती योजनेंतर्गत आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील सर्व विद्यार्थ्यांसाठी योजनेच्या लाभाकरिता पात्रतेची किमान ६० टक्के गुणांची अट चालू शैक्षणिक वर्षापासूनच (२०१७- १८) शिथिल करून ती ५० टक्के करण्यात अाली अाहे. या निर्णयास गुरुवारी मंत्रिमंडळाने मंजुरी दिली, अशी माहिती शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी दिली. 

प्रकाश मेहतांची लाेकायुक्तांमार्फत चाैकशी 
‘म्हाडा’ व ‘एसआरए’ घोटाळाप्रकरणी  गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहता यांची लोकायुक्तांमार्फत चौकशी केली जाईल. ‘एमएसअारडीसी’चे तत्कालिन उपाध्यक्ष राधेश्याम मोपलवार यांची सनदी अधिकाऱ्याच्या समितीमार्फत व  एमअायडीसी भूखंडप्रकरणी उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्यावरील अाराेपांची स्वतंत्र चौकशी केली जाईल, अशी घाेषणा , मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधान परिषदेत केली.
बातम्या आणखी आहेत...