आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Reserve Bank Of India Mumbai Branch Found Fake Note

मुंबई रिझर्व्ह बँकेत साडेतीन लाखांच्या बनावट नोटा

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई: मुंबई रिझर्व्ह बँकेच्या फोर्ट शाखेमध्ये गतवर्षी भरणा झालेल्या साडेतीन लाखांच्या नोटा बनावट असल्याचे उघड झाले आहे. या प्रकरणी झारखंड येथील सैद उल ऊर्फ अस्लम सुरतअली शेख याला अटक करण्यात आली आहे. जुन्या व खराब नोटा बदलून देण्याचे काम करणार्‍या विभागात शेखने नोटांचा भरणा केला होता. नोटांच्या ऑडिटमध्ये साडेतीन लाखांच्या नोटा बनावट असल्याचे व्यवस्थापनाच्या लक्षात आले. बँकेच्या दक्षता विभागाने अधिक चौकशी केल्यानंतर या नोटा गतवर्षी सप्टेंबर ते जून या काळात जमा करण्यात आल्याचे निदर्शनास आले. यात शेखचा हात असल्याचे पुरावे मिळताच पोलिसांनी त्याला अटक केली. तो सध्या पायधुनी येथे राहत असून, मूळचा झारखंडचा आहे. शेखने 3 लाख 88 हजार 770 रुपये किमतीच्या 789 नोटा बँकेत भरल्या होत्या. बहुतांश नोटा कमी किमतीच्या म्हणजे 10, 20 आणि 50 रुपयांच्या पटीत होत्या. रिझर्व्ह बँकेत सहसा इतक्या कमी रकमेच्या नोटांचा भरणा होत नाही. बँकेतर्फे वरिष्ठ अधिकारी प्रवीण जोशी यांनी तक्रार नोंदवली होती. शेखची कसून चौकशी सुरू असून, त्याच्या इतर साथीदारांचा तपास घेण्यात येत असल्याचे पोलिसांनी सांगितले.