आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विचारस्वातंत्र्य अबाधित ठेवले पाहिजे, ‘उडता पंजाब’ चित्रपटाच्या वादावर आलिया भट्टचे मत

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - आपल्या देशात सर्वांना विचारस्वातंत्र्य अाहे. महात्मा गांधी आणि डॉ. आंबेडकरांनी विचारस्वातंत्र्यामुळेच जनतेत बदल घडवून आणले. ही परंपरा आपणास पुढे सुरू ठेवायची आहे. आपण सगळे गांधीजी वा आंबेडकर आहोत, असे मी म्हणणार नाही. परंतु क्रिएटिव्ह क्षेत्रात विचारस्वातंत्र्य अबाधित ठेवले पाहिजे,’ असे मत बाॅलीवूड अभिनेत्री आलिया भट्टने ‘दिव्य मराठी’शी बाेलताना व्यक्त केले.

पंजाबमधील मादक पदार्थांच्या आहारी गेलेल्या तरुणांच्या कथेवर आधारित ‘उडता पंजाब’ चित्रपट येत असून सेन्सॉर बोर्डाने या चित्रपटाच्या नावातून पंजाब शब्द काढून टाकण्यास सांगितले आहे. आप, काँग्रेस या पक्षांनी मात्र या निर्णयाला विरोध केला आहे. राहुल गांधी यांनीही ट्विट करून निर्णयाचा निषेध केला आहे. तर चित्रपटाचा निर्माता अनुराग कश्यप याने हा आमच्या व्यक्तिस्वातंत्र्याचा मुद्दा असून राजकीय पक्षांनी यात उडी घेऊ नये, असे म्हटले आहे. या चित्रपटातील अभिनेत्री आलियाने सांगितले, ‘चित्रपट हे क्रिएटिव्ह क्षेत्र आहे. त्यामुळे आम्ही जे दाखवतो तो आमचा एक विचार असतो आणि सिनेमॅटिक लिबर्टी घेऊन तो पडद्यावर मांडला जातो. क्रिएटिव्ह फील्ड असल्याने आम्हाला तसे स्वातंत्र्य हवे. याचा अर्थ असा नव्हे की आम्ही काहीही दाखवतो, सेन्सॉर बोर्डाने विचार करून निर्णय घेतला पाहिजे. आजचा तरुण खूप फास्ट आहे. टेक्नोसॅव्ही आहे. खूप चांगला आहे. प्रगतीबरोबर जबाबदारीही आली आहे. कुटुंबाची जबाबदारी आहे. मी अशाच मोकळ्या घरात वाढले, आमच्या घरात प्रत्येकाला आपले मत मांडायचा अधिकार आहे. आम्ही प्रत्येक जण एकमेकांच्या मतांचा आदर करतो. संस्कृतीविना समाज चालणार नाही त्यामुळे या दोन्हींचा योग्य मेळ घातला पाहिजे.’

तरुणांना व्यसनापासून परावृत्त करायचंय
‘हा विषय यापूर्वीच चित्रपटात यायला हवा होता. ड्रग्ज ही जगातील मोठी समस्या आहे. सध्या १४ वर्षांच्या युवकापासून ५० वर्षांच्या वृद्धांपर्यंत अनेकांना या व्यसनाने जखडलेले आहे. पूर्वी फक्त २० ते २५ वयोगटातीलच तरुण याचे शिकार होत असत; परंतु आता चित्र बदलले आहे. आमच्या चित्रपटामुळे पाच टक्के तरुण जरी ड्रग्जपासून दूर झाले तरी आम्ही यशस्वी झालो असे मला वाटेल, असे अालिया म्हणाली. सेन्सॉर बोर्ड नकोच असे मी म्हणणार नाही. परंतु त्यांनी समजूतदारपणे काम केले पाहिजे असे मला वाटते,’ अशी अपेक्षा तिने व्यक्त केली.
बातम्या आणखी आहेत...