आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फिफाच्या युवा वर्ल्डकपसाठी सर्वत्र फुटबाॅलची ‘हवा’, राज्यात 10 लाखांहून अधिक विद्यार्थी मैदानात

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई-फिफाच्या अागामी १७ वर्षाखालील विश्वचषकाच्या प्रचार व प्रसारासाठी शुक्रवारी महाराष्ट्रात फुटबाॅलची ‘हवा’निर्माण झाली. यासाठी ‘महाराष्ट्र मिशन १ मिलियन’ फुटबॉल खेळ महोत्सवाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद््घाटन केले.  ६ ऑक्टोबरपासून भारतात हाेणाऱ्या स्पर्धेनिमित्ताने महाराष्ट्रात शुक्रवारी एकाच दिवशी दृष्टिहीनांसह जवळपास १० लाखांहून अधिक विद्यार्थी फुटबॉल खेळले.
 
महाराष्ट्र मिशन मिलियन’ या फुटबॉल खेळ महोत्सवाचा शुभारंभ झाला असून शुक्रवारी दिवसभरात राज्यभरात दहा लाखांहून अधिक विद्यार्थी फुटबॉल खेळले. यामुळे महाराष्ट्र फुटबॉलमय होणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.   

सकाळी मुंबई जिमखाना येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी झेंडा फडकवून महाराष्ट्र मिशन मिलियन या फुटबॉल खेळ महोत्सवाचे उद््घाटन  केले. या प्रसंगी क्रीडामंत्री विनोद तावडे, आमदार राज पुरोहित, मुंबई जिल्हाधिकारी संपदा मेहता आदी उपस्थित होते.
राेनाल्डिन्हाे महाराष्ट्रात : ब्राझीलचा सुपरस्टार फुटबाॅलपटू राेनाल्डिन्हाेने मिशनसाठी महाराष्ट्राचा दाैरा केला. 
बातम्या आणखी आहेत...