आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हिट अँड रन प्रकरणाचा 20 एप्रिल रोजी निकाल, 27 जणांचे जबाब नोंदवले

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - अभिनेता सलमान खानचा सहभाग असलेल्या हिट अँड रन प्रकरणाचा निकाल २० एप्रिल रोजी येणार आहे. या प्रकरणाची सुनावणी करणारे सत्र न्यायाधीश डी. व्ही. देशपांडे यांनी ही माहिती दिली. यावर सलमानचे वकील श्रीकांत शिवडे यांनी सुनावणीची मुदत आणखी वाढवून मागितली. मात्र, न्यायालयाने त्यास नकार दिला. हिट अँड रन प्रकरणात अजावर २७ जणांचे जबाब नाेंदवण्यात आले आहेत.

मुख्य आरोपी सलमानने आपण अपघाताच्या दिवशी आपण गाडी चालवली नव्हती व मद्यही प्राशन केले नव्हते, असा जबाब न्यायालयात सुनावणीदरम्यान दिला होता. २००२ मध्ये सलमानने बेदरकारपणे गाडी चालवून पाच जणांना उडवले हाेते. यात एकाचा मृत्यू तर चार जण जखमी झाले होते. या प्रकरणी सलमानवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे. न्यायालयात या प्रकरणात काय निकाल देते याकडे बॉलीवूडसह अनेकांचे लक्ष लागले आहे.