आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निवृत्त न्यायमूर्ती कोळसे पाटील यांची चौथी आघाडी, शंभर जागा लढवणार

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- काँग्रेस- राष्ट्रवादीआघाडी आणि महायुतीमध्ये सहभागी नसलेल्या आणि सद्सद्वेकबुद्धीने स्वच्छ राजकारण करू इच्छिणाऱ्या छोट्या राजकीय पक्षांना सोबत घेऊन धानसभेसाठी राज्यात चौथी आघाडी उभी करणार असल्याचे निवृत्त न्यायमूर्ती बी. जी. कोळसे पाटील यांनी "दिव्य मराठी'ला सांगितले. लोकशासन आंदोलन पक्ष, देश बचाव पार्टी आणि अखिल भारतीय सम्राट सेना पक्ष या आघाडीत सामील झालेले आहेत. आनंदराज आंबेडकर यांची रिपब्लिकन सेना आणि शराज्य पक्ष यांच्यासोबतची चर्चा अंतिम टप्प्यात आल्याचे कोळसे पाटील यांनी सांगितले.

अन्न, वस्त्र, नारा, शिक्षण आरोग्य या पाच मुद्द्यांवर चौथी आघाडी आगामी धानसभेच्या निवडणूक रिंगणात उतरणार आहे. काँग्रेसने काही जागांचे आमिष दाखवताच भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर त्याला बळी पडतात. आणि तिसरी आघाडी विसर्जित करतात. त्यामुळे "भारिप'च्या पुढाकाराने अस्तित्वात आलेल्या महाराष्ट्र लोकशाही आघाडीत सामील होणार नसल्याचे कोळसे पाटील यांनी सांगितले. त्यांच्या लोकशासन पक्षाने लोकसभा निवडणुकीत बीड, अहमदनगर, धुळे, पुणे आणि यवतमाळ हे चार मतदारसंघ लढवले होते.

मुंबई उच्च न्यायालयातील न्यायमूर्तिपदाचा १९९० मध्ये कोळसे-पाटील यांनी राजीनामा दिला. तेव्हापासून ते राजकारणात आहेत. त्यांचा लोकशासन पक्ष भूमिहीनांचे मोर्चे काढण्यासाठी सज्ज आहे.