आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Reve Party : Actor Apurv Agnihotri And Other 86 Accusing Fix

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

रेव्ह पार्टी : अभिनेता अपूर्व अग्निहोत्री सह 86 जणांवर आरोप निश्चित

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - गेल्या वर्षी मे महिन्यात जुहू येथे झालेल्या रेव्ह पार्टीप्रकरणी अभिनेता अपूर्व अग्निहोत्री त्याची पत्नी शिल्पा, आयपीएल क्रिकेटर राहुल शर्मा आणि इतर 86 जणांवर अमली द्रव्यप्रतिबंधक विशेष न्यायालयाने त्यांच्यावर आरोप निश्चित केले असून याबाबतच्या आरोपत्रांची प्रत त्यांना पाठवली आहे. या प्रकरणी मुंबई पोलिसांनी 6 मार्च रोजी न्यायालयात आरोपपत्र दाखल केले होते. यात दक्षिण आफ्रिकेचा क्रिकेटर वेन पार्नेल याला फरार दाखवण्यात आले आहे. गेल्या वर्षी मे महिन्यात जुहू येथे रेव्ह पार्टीत धाड टाकून पोलिसांनी अपूर्व अग्निहोत्री त्याची पत्नी शिल्पा, राहुल शर्मा आणि इतर 83 जणांना अटक केली होती. यानंतर सर्वांची वैद्यकीय तपासणी केल्यानंतर यातील 35 परदेशी नागरिक त्याच्या मायदेशी परतले होते. त्यामुळे आरोपपत्रात त्यांना फरार दाखवण्यात आले आहे.