आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Review Of Maharashtra : Shivsena Critised On Rahul Gandhi Visit

मागोवा महाराष्‍ट्राचा: राहुल गांधीच्या दौ-यावर शिवसेनेची टीका

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पावसाळ्याच्या तोंडावर काँग्रेसचे युवराज राहुल गांधी यांनी औरंगाबाद जिल्ह्यातील दोन - तीन गावांना भेट दिली. यालाच काँग्रेससह सर्व माध्यमांनी काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांचा दुष्काळग्रस्त मराठवाडाचा दौरा म्हणत डांगोरा पिटला. औरंगाबाद विमानतळापासून तासाभराच्या अंतरावर असलेल्या गावांना भेट देऊन मराठवाड्याच्या दुष्काळाची दाहकता राहुल गांधीना खरेच कळली असेल का, हा खरा प्रश्न आहे. गावक-यांमध्ये मिसळून तुमच्या समस्या सांगा असे आवाहन राहुल यांनी केले आणि गावकरीही शिकवलेल्या पोपटासारखे बोलायला लागले. तेव्हा त्यांच्या समस्यांना उत्तर देण्यासाठी युवराजांनी आपल्या हातातील माईक मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्याकडे सोपवला. राज्याच्या मुख्यमंत्र्यांसमोर तक्रार केल्याने नागरिकांच्या पदरात काही आश्वासने पडली असली तरी त्यांची पूर्तता होईल तेव्हाच राहुल गांधी यांचा दौरा यशस्वी झाला असे म्हणता येईल.

राहुल गांधी यांनी औरंगाबाद जिल्ह्यातील फुलंब्रीतील शेवता येथील रोहयो कामांची पाहाणी केली. यावेळी मुख्यमंत्री चव्हाण यांनी गिरजा वाकोद प्रकल्पासाठी 16 कोटी मंजूर केल्याची घोषणा केली. राहुल गांधी यांनी केंद्र आणि राज्य दोन्ही सरकारे दुष्काळाचा मुकाबला करणा-या जनतेच्या साथीला खंबीरपणे उभी असल्याचा विश्वास दिला.

एक दिवसाचा धावता दौरा करुन राहुल गांधी यांनी दुष्काळग्रस्त मराठवाड्यातील प्रातिनिधीक शेतक-यांची भेट घेऊन दुष्काळ नेमका काय आहे तो समजून घेतला आणि दिल्लीकडे प्रयाण केले. राहुल गांधी यांच्या दौ-या दरम्यान ग्रामस्थांनी आम्हाला रेशनकार्डच मिळाले नसल्याची तक्रार केली होती. याची दखल घेत जिल्हाधिकारी विक्रमकुमार यांनी तातडीने शिधापत्रिका वाटप कार्यक्रम हाती घेतली आहे.