आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Revolver Was Hidden In Birthday Cake For Attack On Abu Salem

सालेमला मारण्‍यासाठी बर्थडे केकमध्‍ये लपवून तुरुंगात पोहोचवली रिवॉल्व्हर

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- अंडरवर्ल्‍ड डॉन अबू सालेमवर झालेल्‍या प्राणघातक हल्‍ल्याचे रहस्‍य अद्याप उलगडलेले नाही. परंतु, यामागे एक मोठा कट असल्‍याचे पोलिसांनी सांगितले आहे. सालेमवर गोळीबार करणारा देवेंद्र जगताप हा भरत नेपाळी गँगचा सदस्‍य आहे. महिन्‍यापूर्वीच पोलिसांच्‍या नजरा चुकवून बर्थडे केकमध्‍ये लपवून रिवॉल्‍व्हर तुरुंगात पोहोचविण्‍यात आली होती, अशी माहिती मिळाली आहे.

सालेमला मारण्‍यासाठी छोटा शकीलने विजय शेट्टीच्‍या माध्‍यमातून जगतापला आदेश दिले होते. छोटा शकीलनेच या हल्‍ल्‍याची सुपारी दिल्‍याचा दावा केला आहे. सालेम आता वाचला, यापुढे वाचणार नाही, अशी धमकीही त्‍याने दिली आहे.

छोटा शकीलने एका इंग्रजी वृत्तपत्राच्‍या प्रतिनिधीला दूरध्‍वनीवरुन सांगितले, 'सालेम आता वाचला. परंतु, आम्‍ही त्‍याला सोडणार नाही. त्‍याने दाऊदला दगा दिला आहे. दाऊदला दगा देऊन तो आमचा शत्रू छोटा राजनच्‍या गटात सामिल झाला. शत्रुचा मित्र आमचाही शत्रूच आहे. भरत नेपाळीच्‍या मृत्‍यूनंतर जेडी माझ्या संपर्कात आला होता. त्‍यानंतर आमच्‍यात एक करार झाला होता.'

सुत्रांच्‍या माहितीनुसार, सालेमच्‍या हत्‍येसाठी जेडीला 5 लाख रुपयांची सुपारी देण्‍यात आली होती. गँगस्‍टर संतोष शेट्टी याचा जेडी अतिशय जवळचा हस्‍तक आहे. शेट्टीचा वाढदिवस सत्र न्‍यायालयात साजरा करण्‍यात आला होता. त्‍याचवेळी जेडीला रिवॉल्‍व्‍हर देण्‍यात आल्‍याचा संशय आहे.