आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Richard Attenborough Is No More, Article In Marathi

ऑस्कर विजेत्या ‘गांधी’चित्रपटाचे दिग्दर्शक सर रिचर्ड अॅटेनबराे काळाच्या पडद्याअाड

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- ‘हे राम’ शब्दाने सुरुवात करत गांधींच्या हत्येपासून काळाला मागे नेत स्वातंत्र्यासाठी विश्वव्यापी लढा देणाऱ्या महात्मा गांधींचे समग्र जीवन - तत्त्वज्ञान ‘गांधी’ या चित्रपटातून १९८२ मध्ये दृश्यात्मक भाषेत समर्थपणे साकारणारे प्रख्यात निर्माते, दिग्दर्शक सर रिचर्ड अॅटेनबराे (९०) यांचे दीर्घ अाजाराने निधन झाले. वाढदिवसाच्या चार दिवस अाधीच त्यांची प्राणज्याेत मालवली.
मूळचे ब्रिटिश असलेले अॅटेनबराे यांनी गांधींजींचे अायुष्य पडद्यावर अाणण्यासाठी २० वर्षे संघर्ष केला हाेता. १९२३ मध्ये जन्मलेल्या अॅटेनबराे यांनी ‘अाे व्हाॅट अ लव्हली वाॅर’सह अनेक चित्रपटांचे दिग्दर्शन व निर्मिती केली हाेती. स्टीव्हन स्पीलबर्ग यांच्या ‘जुरािसक पार्क’, ‘द ग्रेट एस्केप’ मधील त्यांच्या भूमिका गाजल्या. ‘ब्रायटन राॅक’मधील त्यांची ‘पिंकी ब्राऊन’ ही भूमिका वाखाणली गेली.
"गांधी'मध्ये भूिमका साकारलेल्यांचे अनुभव कस्तुरबा गांधी (रोिहणी हट्टंगडी) ‘गांधी’च्या सेटवर पेटी असायची. त्यात पुस्तके होती. अडचण आली की ती चाळली जात. स्क्रीन टेस्टसाठी लंडनला बोलावले होते. नसिरुद्दीन शाह, स्मिता पाटील, जाॅन हर्ट व भक्ती बर्वेही होते. बेन किंग्जले यांनी सूट घातला तेव्हा ते हुबेहूब गांधीजी वाटत होते.

नहरी (ओम पुरी) :
माझी भूिमका खूप लहान होती. परंतु स्क्रीन टेस्टच्या वेळी अॅटेनबरो यांचे गांभीर्य पाहता ती लहान वाटली नाही.ब्रिटिश असूनही त्यांनी भारतीय स्वातंत्र्यलढा ज्या नि:पक्षपातीपणे चितारला ते काम दुसरा कोणी करू शकला नसता.

तैयब मोहंमद (आलोकनाथ)
"गांधी'मध्ये मला तैयब मोहंमदची भूिमका मिळाली. एका मिनिटाचेच काम होते. परंतु अॅटेनबरोंशी झालेली चर्चा अिवस्मरणीय आहे. भारतीय संस्कृतीवर त्यांचे अफाट प्रेम
होते. गांधींची ओळख करून देण्याचे काम त्यांनी केले.