आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Richard Attenborough Is No More, Article In Marathi

‘गांधी’चित्रपटासाठी अॅटेनबराे यांचा तब्बल २० वर्षे संघर्ष

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- अॅटेनबराे यांनी गांधींजींचे अायुष्य पडद्यावर अाणण्यासाठी तब्बल २० वर्षे संघर्ष केला हाेता. अॅटेनबराे यांनी अत्यंत प्रभावीपणे व पारदर्शीपणे त्यांनी गांधी चित्रपट साकारला हाेता. बेन किंग्जले यांनी या चित्रपटात महात्मा गांधींची भूमिका साकारली हाेती, तर राेहिणी हट्टंगडी यांनी कस्तुरबा गांधी साकारल्या हाेत्या.

डाॅ. श्रीराम लागू यांच्यासह अाेम पुरी,अमरीश पुरी, पंकज कपूर अादी अनेक दिग्गज कलाकारांनी अॅटेनबराे यांच्या दिग्दर्शनाखाली हा चित्रपट उभा केला हाेता. या चित्रपटाने जसे अॅटेनबराे यांना अाॅस्कर व अकादमी पुरस्कार मिळवून दिला तसेच ते अापल्या चित्रपट कारकीर्दीत दाेन अकादमी पुरस्कार, चार बाफ्टा पुरस्कार, चार गाेल्डन ग्लाेब पुरस्कारांचेही मानकरी ठरले. त्यांना १९८३ मध्ये पद्मभूषण पुरस्कारानेही भारत सरकारने सन्मानित केले हाेते. त्यांच्या जाण्याने एक दूरदृष्टी असलेला तसेच जिद्दी, संवेदनशील कलावंत कलासृष्टीने गमावला अाहे.

पुढील स्लाइड्‍सवर वाचा, मान्यवरांकडून आदरांचली....