आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हे आहेत कोट्यधीश भिकारी, बँकेत लाखो रुपयांच्‍या ठेवी, वाचाल तर आवाक् व्‍हाल

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पप्‍पू. - Divya Marathi
पप्‍पू.
कल्‍याणमधील एका भिकाऱ्याच्‍या घराला आग लागली. यात पैशे भरलेल्‍या तीन गोण्‍या जळून खाक झाल्‍या. त्‍या अनुषंगाने आम्‍ही सांगणार आहोत कोट्याधीश असलेल्‍या आठ भिकाऱ्यांविषयी विशेष माहिती...
पूप्‍पचे आहे पाच राष्‍ट्रीय बँकांत खाते, कोट्यवधी रुपयांची संपत्‍ती
मूळ बिहारचा आणि मुंबईमध्‍से भीक मागत असलेल्‍या पप्‍पूला तीन महिन्‍यांपूर्वी रेल्‍वे पोलिसांनी पकडले होते. त्‍याची चौकशी केली असता पाच नॅशनल बँकामध्‍ये त्‍याचे खाते असून, त्‍यात लाखो रुपयांची ठेवी असल्‍याची धक्‍कादायक माहिती उघड झाली. दरम्‍यान, त्‍याने कोट्यवधी रुपयांची स्‍थावर संपत्‍ती जमा केल्‍याचेही तपासातून समोर आले. पप्पू असे त्‍याचे नाव आहे.
पप्‍पू असा बनला भिकारी
काही वर्षांपूर्वी पप्‍पूच्‍या वडिलांनी त्‍याला अभ्‍यासावरून रागावले. त्‍यामुळे चिडून पप्‍पू मुंबईला गेला. दरम्‍यान, मुंबईमध्‍ये ट्रेनमधून पडल्‍याने त्‍याच्‍या हाताला गंभीर इजा झाली. मात्र, उपचारासाठी त्‍याच्‍याकडे पैसेच नव्‍हते. कसा तरी सरकारी रुग्‍णालयात उपचार घेतल्‍यानंतर तो रेल्‍वे स्‍थानकावर एका ठिकाणी उभा राहिला. मात्र, येणाऱ्या जाणाऱ्यांनी त्‍याला भिकारी समजून पैसे दिले. पहिल्‍या दिवशी त्‍याला 500 रुपये मिळाले. त्‍यातून पप्‍पूने पोटभर जेवण केले आणि नवीन कपडे घेतले. त्‍यानंतर पुन्‍हा तो त्‍याच ठिकाणी बसला दुसऱ्या दिवशी 700 रुपये आले. परिणामी, तो रोज या ठिकाणी भीक मागण्‍यासाठी यायला लागला. त्‍यातून त्‍याची चांगली कमाई होत होती. पुढे त्‍याने मोठी रक्‍कम जमा करून पाटणा गाठले. येथे त्‍याने पाटणा शहर आणि दीघा येथे जमीन विकत घेतली. पप्‍पू हा विवाहित असून, त्‍याला एक मुलगाही आहे. तो इंग्रजी शाळेत शिकतो.
पुढील स्लाइड्सवर वाचा, मुंबईतील इतर कोट्यधीश भिकाऱ्यांबद्दल...