आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महाराष्ट्रातील सर्वात श्रीमंत उमेदवार, वाराणशीतून येऊन 12 वर्षात उभे केले साम्राज्य

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(भाजपचे उमेदवार मोहित कंबोज आपल्या पत्नीसोबत)

मुंबई- यंदाच्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी सर्वांत श्रीमंत उमेदवार म्हणून मुंबईतील भाजपचे दिंडोशीचे उमेदवार मोहित कंबोज पुढे आले आहेत. प्रतिज्ञापत्रात मोहित यांनी आपली संपत्ती 353.53 कोटी रूपये असल्याचे म्हटले आहे. मोहित अब्जाधिश असले तरी पदवीधरही नाहीत. सन 2002 मध्ये मोहित वाराणसीहून मुंबईत आले. 2005 मध्ये त्यांनी आपली ज्वेलरी कंपनी सुरू केली व आज ते अब्जाधिशांपैकी एक बनले आहेत.

जास्त शिक्षण झाले नसल्याने मोहित यांनी पहिल्यापासून व्यवसायात लक्ष घातले. मोहित यांचा मुख्य व्यवसाय रियल इस्टेट आणिर ज्वेलरी हा आहे. याशिवाय मोहित यांनी बॉलिवूड, क्रिकेट लीग, ज्वेलरी, इन्फ्रास्ट्रक्चर, हॉटेल आणि रिसोर्ट आदि क्षेत्रांत गुंतवणूक केली आहे.

हा अब्जाधिश उद्योगपती व्यवसाय करीत राजकारणातही सक्रिय आहे. मोहित भाजपच्या उत्तर भारतीय मोर्चा विभागाचे अध्यक्ष आहेत. आता नुकतेच त्यांना भाजप मुंबईचे उपाध्यक्षपद दिले गेले आहे.

बॉम्बे बुलियन असोसिएशनचे आहेत अध्यक्ष- बॉम्बे बुलियन असोसिएशन सोने आणि ज्वेलरीचा व्यापार करणा-या व्यापा-यांची संघटना आहे. ही संघटना सन 1948 मध्ये सोन्याचा व्यापार करणा-या सर्व व्यावसियांनी मिळून स्थापन केली होती. सध्या त्या संघटनेचे अध्यक्षपद मोहित यांच्याकडे आहे. मुंबईतील जाने-माने सोन्याचे व्यापारी या संघटनेचे सदस्य आहेत.

पुढे पाहा, मोहित यांच्या प्रचाराची छायाचित्रे ते बॉलिवूडमधील दोस्तांपर्यंत...