आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हे आहेत देशातील श्रीमंत Jeweller, जेट प्लेनसह लग्झरी कार्स दिमतीला!

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कल्याणरमन यांचे खासगी जेट व अलिशान कार्स.. कल्याण ज्वेलर्सची ब्रॅंड अम्बेसिडर ऐश्वर्या राय ही आहे. - Divya Marathi
कल्याणरमन यांचे खासगी जेट व अलिशान कार्स.. कल्याण ज्वेलर्सची ब्रॅंड अम्बेसिडर ऐश्वर्या राय ही आहे.
मुंबई- कल्याण ज्वेलर्सचे चेयरमन तथा व्यवस्थापकीय संचालक टी. एस. कल्याणरमन देशातील सर्वात श्रीमंत ज्वेलरी विक्रेते आहेत. त्यांची वैयक्तिक संपत्ती 1.3 अब्ज डॉलर आहे. श्रीमंत लोकांच्या बाबत माहिती देणा-या वेल्थ-एक्सच्या रिपोर्टमध्ये ही माहिती देण्यात आली आहे. कल्याणरमन यांनी 1 लाख डॉलरच्या भांडवलासह आपले पहिले सोन्याचे दुकान 1993 मध्ये त्रिचुरमध्ये खोलले होते. आता त्यांचा व्यवसास दक्षिण भारतासह देशातील सर्व बड्या महानगरात पसरला आहे. कल्याणरमन यांच्याकडे स्वत:चे एक जेट आहे. याशिवाय त्यांच्याकडे बीएमडब्ल्यू, रॉल्स रॉयससारख्या बड्या कंपन्यांच्या आलिशान कार आहेत.
वडिलांनी शिकवला व्यवसाय-
वयाच्या 12 व्या वर्षी कल्याणरमन यांनी आपल्या पित्याच्या टेक्सटाईल व्यवसायात लक्ष घातले. तेथेच त्यांनी वडिलांकडून व्यवसायाचे धडे घेतले. उन्हाळ्याच्या सुट्टीत त्यांचे वडिल त्यांना दुकानात घेऊन जात असत. माझ्याकडे आलेल्या ग्राहकाला खूष करणे हेच यशाचे गमक आहे. त्यांच्यासमवेत तुम्ही कधीच धोका केला नाही तर तुम्हाला कोणीही यशापासून रोखू शकत नाही असा त्यांचा कानमंत्र आहे.
मुंबईत खरेदी करायचे माल-
जेव्हा कल्याणरमन टेक्सटाईलच्या कामात लक्ष घालायला लागले तेव्हा त्यांचे आजोबा त्यांना मुंबईला एकटेच माल आणायला पाठवत. ते जेव्हा पहिल्यांदा मुंबईत पोहचले तेव्हा घाबरले मात्र नंतर कल्याणरमन त्यांनी आपल्या मेहनतीने टेक्सटाईलमध्ये यश मिळवले. कल्याणरमन यांच्या आजोबाचे नाव कल्याण आहे. ते त्यांनाच आदर्श मानतात. त्यामुळे ते सर्व व्यवसाय 'कल्याण' नावाने करतात.
आता मुलगा सांभाळतो व्यवसाय-
कल्याणरमन यांना दोन मुले आहेत. राजेश आणि रमेश अशी त्यांची नावे आहेत. जे आता कल्याण ग्रुपचा सर्व व्यवहार संभाळतात. मोठा मुलगा राजेश एमबीए केल्यानंतर व्यवसायात लक्ष घातले तर धाकटा रमेश 2000 सालापासून बिजनेस संभाळत आहे.
पुढे स्लाईड्सच्या माध्यमातून पाहा, कल्याणरमन यांचे निवडक PHOTOS...