आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

वाचा, राज्यातील अब्जाधीश आमदाराबाबत ज्याची सून आहे बॉलिवूड अभिनेत्री

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(अभिनेत्री आयशा टाकियासोबत आमदार अबू आजमी)

मुंबई- महाराष्ट्रासोबत हरयाणातील विधानसभेच्या निवडणुकांची घोषणा झाली आहे. Polictical Fever@महाराष्ट्र या सीरीजमध्ये आम्ही आपल्याला महाराष्ट्रातील नेत्यांविषयी व त्यांच्या परिवाराबाबत माहिती देत आहोत. आज आम्ही तुम्हाला महाराष्ट्राच्या सर्वात श्रीमंत आमदार असलेल्या अबू आझमी यांच्याविषयी सांगणार आहोत. अबू आझमी मुंबईच्या मानखुर्द शिवाजी नगरमधून समाजवादी पार्टीच्या तिकीटावर आमदार बनले आहेत. 2009 मध्ये झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीदरम्यान सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात अबू आझमी यांच्याजवळ 126 कोटींची संपत्ती असल्याचे म्हटले होते.

अबू आझमी यांचा नाही विमा संरक्षण- 100 कोटींपेक्षा जास्त संपत्ती असलेले आझमी यांनी विमा संरक्षण काढलेला नाही. 2009 च्या प्रतिज्ञापत्रात घरातील कोणत्याही सदस्याचा विमा नसल्याचे त्यांनी सांगितले होते. आझमी यांच्याजवळ महागड्या गाड्या आहेत. त्यात मर्सीडीज बेंज, होंडा एकॉर्ड आणि फिएट लाउन्ज यांचा समावेश आहे.

जेलमधून सुटताच राजकारणात घेतली उडी- 6 मार्च 1993 रोजी अबू आझमी यांना मुंबईतील बॉम्ब ब्लास्टच्या आरोपाखाली अटक करण्यात आली. एक वर्ष जेलमध्ये राहिल्यानंतर आझमी यांना सुप्रीम कोर्टाने त्यांना निर्दोष सोडले. त्यानंतर आझमी यांनी राजकारणात उडी घेतली. आजच्या त्यांच्यावर विविध 9 केसेस आहेत. यात फसवणूक, जबरदस्तीने लूट, वसूली आदी गंभीर गुन्हे दाखल आहेत. याशिवाय भड़काऊ भाषण देण्याचाही त्याच्यावर आरोप आहे.
आयशा टाकिया आहे त्यांची सून- फिल्म अभिनेत्री आयशा टाकिया हिने अबू आझमी यांचा मुलगा फरहान आझमी याच्यासोबत लग्न केले आहे. फरहान राजकारणाबरोबरच हॉटेल आणि रेस्टारेंट बिजनेसमध्ये आहे. फरहान आणि आयशा यांच्यात लग्नात बॉलिवूड आणि राजकारणातील अनेक लोकांनी सहभाग घेतला होता.
पुढे पाहा, अबू आझमी यांची काही छायाचित्रे...