मुंबई- तेवीस वर्षीय तरुणीचा ऑटोत विनयभंग करून तिला रस्त्यावर फेकून देणाऱ्या ऑटोचालकासह सहप्रवाशाला पोलिसांनी बुधवारी अटक केली. संतोष लोखंडे आणि लुईस वाडी अशी आरोपींची नावे आहेत.
गेल्या आठवड्यात ठाण्यात ऑटोमध्ये तरुणीचा विनयभंग करून तिला रस्त्यावर फेकून दिल्याची घटना उघडकीस आली होती. तरुणीने तक्रार दिल्यानंतर दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. मात्र, आरोपी पोलिसांना सापडत नव्हते.
पोलिसांनी २० ठिकाणचे सीसीटीव्ही फुटेज पाहून बुधवारी लोखंडे आणि वाडी याला अटक केली. दरम्यान, दोघेही रेकॉर्डवरील आरोपी असल्याचे पोलिसांनी सांगितले.