आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Rip Message Of For Dara Singh On Twitter Wikipedia Calls Him Dead

दारा सिंह यांना ब्रेन हॅमरेज ; विकिपीडियाने ठरवले मृत, ट्विटरवर श्रद्धांजली

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - सोशल नेटवर्कींग साईट ट्विटरवर प्रसिद्ध बॉलिवूड स्टार आणि पैलवान दारा सिंह यांना श्रद्धांजली वाहिली जात आहे. वास्तविक दारा सिंह यांच्यावर मुंबईमधील कोकीळाबेन हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आहेत. बुधवारी ११ वाजता प्रसारित करण्यात आलेल्या मेडीकल बुलेटीननुसार त्यांना ब्रेन हॅमरेज झाले असून ते कोमामध्ये जाण्याची शक्यता डॉक्टरांनी वर्तवली.
मात्र, ट्विटरवर अनेक लोक त्यांच्या मृत्यूची बातमी एकमेकांना शेअर करत आहेत. तर काही लोकांचे म्हणणे आहे की, दारा सिंह यांच्या मृत्यूची बातमी म्हणजे अफवाच आहे. अधिकृत माहिती मिळाल्यानंतरच लोकांनी अशी माहिती शेअर करावी.
गुजरात काँग्रेस अध्यक्ष अर्जुन मोधवाडिया यांनी ट्विटरवर दारा सिंह यांना श्रद्धांजली अर्पण करतांना लिहिले आहे की, दारा सिंह यांची स्वर्गयात्रा सुखद होवो... आम्हाला नेहमी तुमची आठवण येत राहील... मोधवाडिया यांच्या या ट्विटवर गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांनी प्रतिक्रिया नोंदवली आहे. ते लिहितात, दारा सिंह अजून हॉस्पिटलमध्ये आहेत. मात्र, अर्जुन मोधवाडिया यांनी त्यांना स्वर्गात पाठवले... त्यांच्यासाठी देवाकडे प्रार्थना करा...
PHOTOS : दारा सिंग यांच्या खाजगी आयुष्यावर एक नजर
दारा सिंग कृत्रिम श्वासोच्छवासावर, प्रकृती गंभीर
दारा सिंग यांना हृदयविकाराचा झटका, रुग्‍णालयात दाखल