Home »Maharashtra »Mumbai» Rishi Vohra First Novel Publish

ऋषी व्होरा यांची पहिली कादंबरी प्रकाशित

प्रतिनिधी | Sep 27, 2012, 04:10 AM IST

मुंबई - मालिका, टीव्ही शोजचे दिग्दर्शक, स्तंभलेखक म्हणून ओळख असलेले ऋषी व्होरा यांची ‘वन्स अपॉन द ट्रॅक्स ऑफ मुंबई’ ही पहिली कादंबरी नुकतीच प्रकाशित झाली आहे. जयको पब्लिशिंग हाऊसने ही कादंबरी प्रकाशित केली आहे.
अनेक टीव्ही मालिका, शोजची निर्मिती आणि दिग्दर्शन करणारे व्होरा सॅन फॅ्रन्सिस्को विद्यापीठातून ग्रीन एमबीए पूर्ण करून पुन्हा मुंबईत स्थायिक झाले आहेत. मुंबईच्या पार्श्वभूमीवर त्यांनी आपल्या पहिल्या कादंबरीचे कथानक विणले आहे. मतिमंद सिझोफ्रेनिक नायक, एकाच मुलीवर प्रेम करणारे पण एकमेकांचा दुस्वास करणारे दोन भाऊ आणि या सर्वांना पार्श्वभूमी आहे ती मुंबईची जीवनवाहिनी असणार्‍या रेल्वेमार्गाची. थेट आणि भिडणारी कथनशैली, अनपेक्षित वळणे घेत जाणारे प्रेम, धाडस, दु:ख, विरह आदी विविध भावनांचे रंग या कादंबरीत पाहायला मिळतात. चित्रपटाला शोभेल असे कथानक असणारी ही कादंबरी वाचकांना खिळवून ठेवणारी असल्याचे प्रकाशक आकाश शहा यांनी म्हटले आहे.

Next Article

Recommended