आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अभिनेत्री जेनेलिया म्हणते, ‘रब ने बना दी जोडी...!’

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - साधारण नऊ वर्षांपूर्वी त्यांनी एकमेकांना म्हटले ‘तुझे मेरी कसम’, त्यानंतर त्यांनी एकत्रितपणे ‘मस्ती’ही केली. मात्र आता ‘तेरे नाल लव्ह हो गया’ म्हणत ते येत्या 3 फे्रबुवारी रोजी साताजन्मासाठी एकमेकांचे होणार आहेत. होय ! बॉलीवूडमधील रितेश आणि जेनेलिया हे लवबर्ड 3 फेब्रुवारीला विवाहबद्ध होणार आहेत.
जेनेलियाने सांगितले की, आम्ही दोघेही एकमेकांना समजून घेतो. तसेच आमच्यामध्ये गेल्या नऊ वर्षांपासून चांगली मैत्री आहे. त्यामुळे आम्ही दोघेही एकमेकांना एकदम पूरक आहोत. तसेच लग्नानंतरची आमची वाटचालही अशीच सुरू राहील अशी अपेक्षाही तिने व्यक्त केली. आम्ही आजवर आमच्या नात्याविषयी अधिक खुलेआमपणे बोललो नाही. कारण की, यामागे आमच्या वडिलधा-यांचा मान राखण्याचा आमचा हेतू होता असेही तिने या वेळी सांगितले. तसेच आमच्या विवाहासाठी दोघांच्या कुटुंबीयांनी परवानगी दिली आहे.