आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुन्हा गजर 'माऊली'चा : रितेश देशमुखच्या ‘लय भारी’चा सिक्वेल 'माऊली'च्या तयारीत

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - ‘लय भारी’ चित्रपटाने बाॅक्स अाॅफिसवर प्रचंड यश मिळवल्यानंतर दिग्दर्शक निशिकांत कामत अाता या चित्रपटाच्या सिक्वेलच्या तयारीला लागले अाहे. ‘माउली’ या नावाने येणा-या या सिक्वेलमध्ये रितेश देशमुखच अभिनेता असणार आहे.

रितेशने अलीकडेच यासंदर्भात ट्विट केले अाहे. "लय भारी' या चित्रपटातून रितेशने मराठी पडद्यावर पदार्पण केले हाेते. या चित्रपटातील त्याची दुहेरी भूमिका अत्यंत गाजली हाेती. शरद केळकर, तन्वी अाझमी, राधिका अापटे यांनीही या चित्रपटात अापल्या भूमिकांचा ठसा उमटवला हाेता. अाता ‘माउली’मध्ये रितेशची नायिका काेण असणार अाहे हे मात्र अद्याप स्पष्ट हाेऊ शकले नाही. मात्र, हा चित्रपट २०१६ मध्ये प्रदर्शित हाेणार असल्याचेही रितेशने जाहीर केले अाहे.

‘माउली’कडून सुपरडुपरची अपेक्षा
"लय भारी' चित्रपटाने मराठी चित्रपटांचे अार्थिक गणित चांगलेच पुढे नेले हाेते. या चित्रपटाने २० ते २५ काेटींपर्यंत व्यवसाय केला होता. अाता प्राइम टाइमविषयीही राज्य सरकारने मराठी चित्रपटांसाठी अनुकूल परिस्थिती निर्माण केल्याने २०१६ मध्ये प्रदर्शित हाेणा-या सिक्वेलकडून दिग्दर्शक निशिकांत व रितेश देशमुख यांना अाणखी माेठ्या यशाची अपेक्षा आहे.