आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

RJ मलिष्कावरील कारवाईचा मुद्दा तापला; स्थायी समितीच्या बैठकीत शिवसेना-भाजप आमने-सामने

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई महापालिकेचे म्हणणे आहे की, मलिष्काच्या घरात मलेरियाचे डास सापडले आहेत. - Divya Marathi
मुंबई महापालिकेचे म्हणणे आहे की, मलिष्काच्या घरात मलेरियाचे डास सापडले आहेत.
मुंबई- मुंबई महापालिकेच्या स्थायी समितीच्या बैठकीत मलिष्काचा मुद्दा तापला. मलिष्काला टार्गेट केल्याचा आरोप भाजपने केला आहे. मलिष्का यांनी मुंबईकरांना ज्या गोष्टींचा सामना करावा लागतो त्यावर मार्मिक टीका केली आहे. हे लोकशाही मूल्यांना धरून आहे, त्याचे आम्ही स्वागत करतो असे भाजप नेते आशिष शेलार यांनी म्हटले आहे.
 
मनसे, समाजवादी पक्ष मलिष्काच्या बाजूने
समाजवादी पक्षाने आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने महापालिका सुडबुध्दीने कारवाई करत असल्याचा आरोप केला आहे. तर मलिष्काच्या मागे कोण आहे, अशी कुजबुज शिवसेनेत सुरू झाली आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नगरसेवक संदीप देशपांडे यांनी खड्ड्याच्या मुद्द्यावरुन तुम्ही किती लोकांचे तोंड बंद करणार आहात? असा थेट प्रश्न शिवसेनेला विचारला आहे. दरम्यान RJ मलिष्काही सध्या आयफा अॅवार्डसाठी भारताबाहेर गेली आहे. बीएमसी अॅक्टमधील कलम 381 (ब) नुसार मलिष्काला नोटीस बजावण्यात आली असून कारवाई करण्यात आली आहे. 
 
कुठे आढळल्या डेंगूच्या अळ्या
मुंबई महापालिकेने मंगळवारी मलिष्काच्या वांद्र्यातील पाली नाका इथल्या सनराईज इमारतीमधील घरात तपासणी केली. यावेळी घरातील शोभेच्या कुंडीखालील डिशमध्ये साठलेल्या पाण्यात डेंग्यूच्या अळ्या आढळल्या. यानंतर महापालिकेने मलिष्काला नोटीस बजावली आहे. याप्रकरणी मलिष्कावर नियमानुसार कारवाई करावी अशी मागणी सभागृह नेते यशवंत जाधव यांनी केली आहे.
 
हेही वाचा-
 
 
 
 
 
बातम्या आणखी आहेत...