आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रस्त्यावरील अपघातग्रस्तांच्या उपचारासाठी विम्याचे कवच, अाराेग्यमंत्री डाॅ. सावंत यांची घाेषणा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - ‘तामिळनाडूत रस्ते अपघातग्रस्तांच्या उपचारासाठी कॅशलेस पाॅलिसी सुरू करण्यात अाली अाहे. त्याच धर्तीवर राज्यातही रस्त्यावर जखमी हाेणाऱ्या रुग्णांना तातडीने उपचार िमळावेत यासाठी तीन िदवसांचे विमा सुरक्षा कवच देण्याचा िवचार केला जाईल,’ अशी घाेषणा अाराेग्यमंत्री डाॅ. दीपक सावंत यांनी गुरुवारी केली.
राज्यातील सार्वजनिक अाराेग्य विभागावरील अल्पकालीन चर्चा राष्ट्रवादीचे अमरसिंह पंिडत यांनी विधान परिषदेत उपस्थित केली. उत्तर देताना डाॅ. सावंत म्हणाले, ‘अपघाताचे प्रमाण वाढत असून अपघातग्रस्तांना खासगी रुग्णालयात उपचारासाठी भरती करून घेतले जात नाही. त्यांना तातडीने जवळच्या रुग्णालयात उपचार िमळावेत यासाठी तामिळनाडूच्या धर्तीवर तीन िदवसांचे विमा कवच देण्याचा िवचार राज्य सरकार करीत अाहे. तसेच ग्रामीण भागातील रुग्णालयात डाॅक्टर राहावेत म्हणून वर्षानुवर्षे एकाच पदावर काम करणाऱ्या डाॅक्टरांना पदाेन्नती देण्यासाठी पंधरा िदवसांत यादी तयार करून पदाेन्नती देण्यात येईल. सेवेत कार्यरत असलेल्या १५५ डाॅक्टरांना सेवेतून बडतर्फ करण्यात अाले. उर्वरित ३०० डाॅक्टरांचा अद्यापही सुगावा लागलेला नाही,’ असेही सावंत म्हणाले.
जीवनदायी याेजनेच्या िनकषात बदल, पत्रकारांचाही समावेश
राजीव गांधी जीवनदायी याेजनेत नाेव्हेंबरमध्ये बदल केले जाणार अाहेत. या िनकषात पांढरे शुभ्र कार्डधारक अाणि पत्रकारांचा समावेश केला जाईल. त्याचबराेबर रुग्णालयांची संख्या वाढवण्यात येऊन उपचाराची मर्यादा वाढवण्याचा िवचार केला जात अाहे, असे डाॅ. सावंत म्हणाले.

अात्महत्याग्रस्त १४ िजल्ह्यांत डाॅक्टरांची पदे भरणार
राज्यातील शेतकरी अात्महत्याग्रस्त १४ िजल्ह्यांत डाॅक्टरांची ४०० रिक्त पदे तातडीने भरण्याची कार्यवाही केली जाईल. १५ िदवसांत या संदर्भातील शासन िनर्णय काढण्यात येईल, असे डाॅ. सावंत यांनी सांगितले.
अाैषधी खरेदीची चाैकशी करणार
अाराेग्य विभागाने २०१३ मध्ये खरेदी केलेले हृदयविकार रुग्णांसाठी लागणारे स्टेस्टाेकाॅयमा, पॅरासिटाॅमाॅलचा बदललेला रंग अाणि भंडारा िजल्ह्यातील सिरींज व अाैषधी खरेदीची चाैकशी केली जाईल तसेच िजल्हावार खरेदीची मागणी घेऊन प्रधान सचिव यांच्या अध्यक्षतेखालील समितीत ४० सदस्य असून तेच खरेदीचा निर्णय घेतात. पारदर्शकपणे खरेदीची चाैकशी करण्यासाठी एनएचअारएम अायुक्तांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात येत असल्याचे डाॅ. सावंत यांनी सांिगतले.