आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Road Clear To Shivajimaharaj Memorial, Union Environment Department Sanctioned

शिवरायांच्या स्मारकातील अडथळे दूर, केंद्रीय पर्यावरण विभागाची तत्त्वत: मान्यता

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - अरबी समुद्रात छत्रपती शिवाजी महाराज यांचे प्रस्तावित स्मारक उभारण्यास गुरुवारी केंद्रीय पर्यावरण मंत्री जयंती नटराजन यांनी तत्त्वत: मान्यता दिल्याचे जाहीर केले. मात्र हे स्मारक ‘सीआरझेड 4’मध्ये येत असल्याने आणखी 40 परवानग्या घेण्याची आवश्यकता असल्याचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी या वेळी सांगितले.


केंद्रीय पर्यावरण आणि वने विभागाशी संबंधित महत्वाच्या बाबींवर गुरुवारी सह्याद्री अतिथीगृहात बैठक झाली. या बैठकीला मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, वनमंत्री पतंगराव कदम, पर्यावरण मंत्री संजय देवतळे, पर्यावरण राज्यमंत्री उदय सामंत यांच्यासह अनेक प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते. बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना जयंती नटराजन यांनी सांगितले की, स्मारकाच्या परिसरात कुठलेही व्यावसायिक उपक्रम किंवा दुकाने, हॉटेल्स उभारले जाणार नाहीत, या अटींवर पर्यावरण विभागाने स्मारक उभारणीस तत्वत: मान्यता दिली आहे. मुख्यमंत्री म्हणाले की, सीआरझेड-4 अंतर्गत काही बाबींना पर्यावरण विभागाची मान्यता मिळाल्यास स्मारकाचे काम सुरु करता येईल.