आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Road Damage In Mumbai, Comment Congress President Janardhan Chandurkar

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

..तर त्यांना काळ्या यादीत टाका; काँग्रेस अध्यक्ष जनार्दन चांदूरकर यांचे मत

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- मुंबईतील रस्त्यांची चाळण नेमकी कशामुळे झाली, याची तपासणी करण्यासाठी या रस्त्यांच्या कामाचे थर्ड पार्टी ऑडिट करावे आणि निकृष्ट दर्जाचे काम करणार्‍या कंत्राटदारांना काळ्या यादीत टाकावे, अशी मागणी काँग्रेसचे मुंबई प्रदेशाध्यक्ष प्रा. जनार्दन चांदूरकर यांनी शनिवारी महापालिका आयुक्त सीताराम कुंटे यांना केली. या वेळी एकनाथ गायकवाड, भालचंद्र मुणगेकर यांची उपस्थिती होती.

मुंबईतील अंतर्गत रस्त्यांची पावसामुळे अक्षरश: चाळणी झाली आहे. पालिका व शिवसेना भ्रष्टाचाराने बरबटल्या आहेत. त्यामुळेच रस्त्यांची बांधकामे निकृष्ट दर्जाची होत आहेत. याला जबाबदार असणार्‍या कंत्राटदारांवर कारवाई व्हावी. तसेच पालिकेत कंत्राटांच्या बाबतीत व्हेंडर सिस्टिम लागू करावी, जेणेकरून एकदा काळ्या यादीत टाकलेल्या कंत्राटदाराला अथवा त्याच्या भागीदारांना दुसरी कंपनी स्थापन करून नव्याने कंत्राटे मिळवता
येणार नाहीत.

दहीहंडी व गणेशोत्सवांपूर्वी रस्ते दुरुस्त करावेत, अशी मागणी चांदूरकर यांनी या वेळी केली. या मागण्या कुंटे यांनी मान्य केल्याचे चांदूरकर यांनी सांगितले. तसेच, खड्ड्यांच्या दुरवस्थेकडे लक्ष वेधण्यासाठी काँग्रेसच्या वतीने आझाद मैदानात मोर्चाचेदेखील आयोजन करण्यात आले होते.
या मोर्चात काँग्रेसच्या मुंबई महापालिकेतील सर्व नगरसेविका सहभागी झाल्या होत्या. मोर्चाला महिलांची उपस्थितीदेखील लक्षणीय होती. दरम्यान, मुंबईत पडलेल्या खड्ड्यांची दखल ही उच्च न्यायालयानेही घेतली आहे. त्यानंतरही सरकार यावर उपाययोजना करत नसल्याची अनेक संघटना व नागरिकांची तक्रार आहे.