आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

खड्डे न बुजवल्यास दुप्पट दंड; पॉटव्होल ट्रॅकिंग प्रणाली ठरली कुचकामी

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - मुंबईतील रस्त्यांची दुर्दशा रोखण्यासाठी महापालिका प्रशासनाने कडक पाऊल उचलले असून खड्डे बुजवण्यास विलंब करणा-या कामचुकार ठेकेदारांना दुप्पट दंड आकारण्यात आल्याची माहिती आयुक्त सीताराम कुंटे यांनी दिली.
मुंबईत रस्त्याची कामे एकूण नऊ ठेकेदारांना दिलेली आहेत. एकदा रस्ता केल्यानंतर त्या रस्त्याची काहीकाळ देखभाल संबंधित ठेकेदाराने करावयाची असते. डांबरी रस्त्याची 3 वर्षे तर सिमेंट काँक्रीटचा रस्ता केलेल्या ठेकेदाराने रस्त्याची देखभाल 5 वर्षे करायची असते. मुदतीपूर्वी रस्त्यावर पडलेले खड्डे संबंधित ठेकेदाराने 24 तासाच्या आत बुजवण्याचे बंधन ठेकेदारावर आहे; परंतु ठेकेदार खड्डे बुजवण्याकडे नेहमीच दुर्लक्ष करतात.
त्यासाठी पालिकेने यंदा ‘व्हाईस ऑफ सिटीजन’ नावाने संकेतस्थळ तयार केले असून रस्त्यावर पडलेल्या खड्डयाचे छायाचित्र काढून संकेतस्थळावर पाठवल्यास पालिकेचे अधिकारी ठेकेदारास संबंधित खड्डा बुजवण्याविषयी मेसेज अलर्ट पाठवतात. मेसेज अलर्ट पाठवूनही ठेकेदाराने खड्डा बुजवण्यास विलंब केल्यास 1 हजाराचा दंड आकारण्यात येत असे. परंतु ठेकेदार खड्डे बुजवण्याबाबत दिरंगाई करत असल्याने आयुक्तांनी दंडाच्या रकमेत दुपटीने वाढ केली आहे. या ठेकेदारांना काळ्या यादीत टाकण्याची तंबीही दिली आहे. रस्त्यावरील खड्डे त्वरीत बुजवले जावेत यासाठी पालिका प्रशासनाने मोठा खर्च करून यंदा ‘पॉटहोल ट्रॅकर’ प्रणाली खरेदी केली आहे. खड्डयाचे छायाचित्र काढण्यासाठी अ‍ॅड्रॉईड प्रणालीचे मोबाइल्स नागरीकांकडे असणे आवश्यक असते. आपल्याकडे अ‍ॅड्रॉईडचे मोबाइल्स नाहीत असे नगरसेवकांनी आक्षेप घेतले होते. त्यामुळे पालिकेतर्फे 25 लाख रूपये खर्चून अ‍ॅड्रोईड प्र्रणाली असणा-या मोबाइल्सची खरेदी करण्यात आली.
ठेकेदारांची शिरजोरी - एका-एका रस्त्यावर हजारो खड्डे आहेत. या सर्वांची छायाचित्रे ‘व्हाईस ऑफ सिटीझन’वर पाठवले जाणे शक्य नाही; परंतु ज्या खड्ड्यांची छायाचित्रे येतील तेच खड्डे आम्ही बुजवणार, असा युक्तिवाद ठेकेदारांकडून होत असल्याने पालिकेची गोची झाली आहे