आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रस्ते घोटाळ्याचा पंकजांवर आरोप, कलंकित मंत्र्यांवरून विधानसभेत गदारोळ

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांची भागीदारी असलेल्या कंपनीचा मुंबईतील रस्ते घोटाळ्यात समावेश असल्याचा अाराेप करत विरोधकांनी पुन्हा एकदा सरकारवर हल्लाबोल केला. मात्र, पुराव्याशिवाय केलेल्या आरोपांबाबत काँग्रेसचे विजय वडेट्टीवार यांनी माफी मागावी, अशी मागणी करत भाजपच्या सदस्यांनी जोरदार गोंधळ घातला. दरम्यान, माझा किंवा माझ्या कुटुंबीयांचा मुंबईच्या रस्ते घोटाळ्यात कोणताही सहभाग नाही. मी मंत्री झाले म्हणून आपल्या पतीला व्यवसाय करण्याबाबतचा अधिकार कुणीही हिरावून घेऊ शकत नसल्याचे मुंडे यांनी या आरोपाला उत्तर देताना सांगितले.

विधानसभेत काँग्रेसचे आमदार विजय वडेट्टीवार यांनी एका इंग्रजी वृत्तपत्रात छापून आलेल्या बातमीचा संदर्भ देत ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडेंचा विषय उपस्थित केला. तसेच रस्ते घोटाळ्यात नाव असलेल्या कंपनीत पंकजा मुंडे यांचे कुटंुबीय भागीदार असल्याचा थेट आरोप केला. विशेष म्हणजे या वेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसही सभागृहात उपस्थित होते. वडेट्टीवार यांच्या या अारोपावर भाजपचे सदस्य चांगलेच आक्रमक झाले. नोटीस न देता विरोधक एखाद्या मंत्र्यांवर कसे काय आरोप करू शकतात, असे सांगत सत्ताधारी बाकावरून वडेट्टीवार यांनी माफी मागावी, अशी मागणी केली.
पुढे वाचा..

खडसेंकडून पाठराखण
खडसेंकडून पाठराखण
माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी मात्र पंकजा मुंडे यांची पाठराखण केली. निव्वळ मीडिया ट्रायलमुळे एखाद्याने आयुष्यभर कमावलेली राजकीय इभ्रत एका क्षणात वाया जात असल्याचे खडसे म्हणाले. वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनीही वृत्तपत्रे आणि माध्यमे अनेक घटनांचे अतिरंजित वृत्तांकन करत असल्याचा दावा केला.
बातम्या आणखी आहेत...