मुंबई- नवी मुंबईतील एका बँकेखाली चोरट्यांनी तब्बल ५० फूट लांब भुयार खोदून बँकेत प्रवेश केला. यानंतर तिजोरीत ठेवलेली एक कोटी रुपयांची रोकड व लॉकरमधील दागदागिने लांबवले. बँक ऑफ बडोदाच्या जुईनगर शाखेत ही घटना घडली. शनिवार-रविवारच्या सुटीनंतर सोमवारी कर्मचारी बँकेत आल्यानंतर लॉकर व तिजोरीचे कुलूप तोडलेले दिसले. चोरट्यांनी बँकेजवळील एका किराणा दुकानातून लॉकर रूमपर्यंत ५० फुटांचे भुयार खोदले होते. तथापि, चोर बँकेची मुख्य तिजोरी उघडू शकले नाहीत.
पुढील स्लाईडवर आणखी फोटो