आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शासकीय रुग्णालयात अद्ययावत यंत्रसामग्री

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - राज्यातील जिल्हा व शासकीय रुग्णालयात लवकरच अद्ययावत यंत्रसामग्री येणार आहे. याबाबतचे कंत्राट ‘जीई’ या कंपनीला देण्यात आल्याची माहिती आरोग्यमंत्री सुरेश शेट्टी यांनी गुरुवारी दिली.
राज्यातील शासकीय आणि महिला रुग्णालयांमध्ये सध्या असलेल्या तपासणी यंत्रांची अत्यंत वाईट अवस्था असल्याची कबुली शेट्टी यांनी दिली. या सर्व बाबींवर आउटसोर्सिंगचा उपाय शोधला असून जनरल इलेक्ट्रिकल्सला मराठवाडा, कोकण आणि उत्तर महाराष्ट्रात तपासणी यंत्रे चालवण्याचे कंत्राट दिले आहे. या कंपनीने सध्या 8 एमआरआय यंत्रे बसवण्याचे मान्य केले असून सिटी स्कॅन आणि इतर अत्यंत यंत्रे लवकरच बसवली जातील. यासाठी कंपनीला सुमारे दोनशे कोटी रुपये खर्च येणार असल्याचे शेट्टी म्हणाले.

महावितरणशी बोलणी
खासगी व सरकारी दवाखान्यातील रुग्णांसाठी वेगळे तपासणी शुल्क आकारण्याची मुभा कंपनीला देण्यात आली आहे. या यंत्रांसाठी स्वतंत्र फीडर उपलब्ध करून देण्याबाबत महावितरणशी चर्चा झाली आहे. सध्या शासकीय रुग्णालयात असलेली यंत्रणा ग्रामीण रुग्णालयांमध्ये स्थलांतरित करण्यात येणार आहे. अकोल्यासाठी लवकरच टेंडर काढण्यात येणार आहे.