मुंबई - इन्फोसिसचे संस्थापक नारायण मूर्ती यांचा मुलगा रोहन मूर्ती आणि त्यांची पत्नी लक्ष्मी वेणू सध्या एकमेकांपासून दूर झाले आहेत. दोघांनी 31 ऑक्टोबरला एकमेकांच्या सहमतीने घटस्फोट घेतला आहे. रोहन आणि लक्ष्मी दोन वर्षांपासून एकमेकांपासून दूर राहत असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. घटस्फोटासाठी त्यांनी ए्प्रिल महिन्यात कागदपत्रांची पुर्तता केली होती. लक्ष्मी या टीव्हीएसचे मालक वेणू श्रीनिवासन यांची एकुलती एक मुलगी आहे. या अब्जाधीश जोडीचे 2011 मध्ये लग्न झाले होते.
2014 मध्ये वाद आला पुढे
रोहन आणि लक्ष्मी यांच्यातील वाद हा 2014 मध्ये समोर आला. मूर्ती फॅमिलीकडील सुत्रांच्या माहितीनुसार रोहन आणि लक्ष्मी हे दोन वर्ष ठिकठाक राहिले. पण 2014 मध्ये लक्ष्मी यांचा भाऊ सुदर्शन यांच्या लग्नासाठी निमंत्रण असूनही मूर्ती कुटुंबातून कोणीच आले नव्हते. यामुळे दोघांमध्ये वाद झाला होता.
लग्नाला यांची होती उपस्थिती
रोहन आणि लक्ष्मी यांच्या लग्नासाठी राजकीय क्षेत्रातील दिग्गज पुढा-यांची उपस्थिती होती. भाजपा नेते लाल कृष्ण आडवाणी, कॉंग्रेस नेते कमलनाथ, आनंद शर्मा, माजी गृहमंत्री पी. चिदंबरम यांच्यासह अनेकांची या लग्नसोहळ्याला उपस्थिती होती.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा, रोहन आणि वेणू यांची काही खास PHOTOS...