आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Rohan Publication Get Excellent Books Production National Award

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

रोहन प्रकाशनला सर्वोत्तम ग्रंथ निर्मितीसाठी राष्‍ट्रीय पुरस्कार जाहीर

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - ‘द फेडरेशन ऑफ इंडियन पब्लिशर्स’ या भारतीय प्रकाशकांच्या राष्ट्रीय पातळीवरील संघटनेने ‘रोहन प्रकाशन’ या संस्थेला प्रादेशिक वर्गवारीतील 2013 सालचा देशातील सवरेत्तम ग्रंथनिर्मिती (जॉकेट्स) पुरस्कार घोषित केला आहे. ‘रोहन प्रकाशन’चे प्रदीप चंपानेरकर यांना नवी दिल्लीतील प्रगती मैदान येथे शुक्रवारी 30 ऑगस्ट रोजी आयोजित कार्यक्रमात हा सन्मान दिला जाईल.

रोहन प्रकाशनच्या ‘असा घडला भारत’ या ग्रंथात स्वतंत्र भारताच्या 65 वर्षांच्या वाटचालीचा आढावा घेतला असून मिलिंद चंपानेरकर आणि सुहास कुलकर्णी यांनी त्याचे संपादन केले आहे. राजू देशपांडे यांनी मुखपृष्ठ तयार केले असून पुस्तकाची रचना व मांडणी प्रकाशक प्रदीप चंपानेरकर यांनीच स्वत: केली आहे. ‘रोहन प्रकाशना’ला उत्कृष्ट निर्मितीसाठी अनेक पुरस्कार यापूर्वी प्राप्त झाले आहेत. त्यात ‘त्यांनी घडवलं सहस्त्रक’, ‘जागतिक रंगभूमी’, ‘12व्या शतकातील खाद्यसंस्कृती’ अशा ग्रंथांचाही समावेश आहे. ‘रोहन’च्या पुस्तकांची निर्मिती वाचकांच्या सोयीच्या दृष्टिकोनातून सवरेत्तम व्हावी व त्यात उत्तम निर्मितीमूल्यांबाबत सातत्य राखले जावे यासाठी आपला नेहमीच प्रयत्न असतो.

या प्रयत्नांची क्षेत्रातील जाणकारांकडून दखल घेतली गेल्यास निश्चितच आनंद होतो, तसेच हे यश ‘रोहन’चे सांघिक यश आहे, अशी प्रतिक्रिया रोहन प्रकाशनच्या प्रदीप चंपानेरकर यांनी व्यक्त केली आहे.