आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एसीपी शिवाजी नरवणे आहे पक्का रंगेल, पत्नी, नंदाशिवाय आणखी 4 महिलांसोबत \'अफेयर\'

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- रोहन झोडगे हत्या प्रकरणात अटकेत असलेल्या एसीपी शिवाजी नरवणेंची आणखी नवी-नवी माहिती मिळत आहे. शिवाजी नरवणे हा तामसी वृत्तीचा व रंगेल असल्याचे पोलिस वर्तुळात चर्चा सुरु आहे. पहिली पत्नी, रोहनची आई नंदा यांच्यासोबत आणखी 4-5 ठिकाणी नरवणेंने आपल्या रंगेलपणासाठी सोय करून ठेवल्याचे पुढे येत आहे. दरम्यान, रोहन झोडगे हत्याप्रकरणी नरवणे याने कबुली दिली असून, त्यात नंदासह त्याने हत्या केल्याचे म्हटले आहे. दरम्यान, रोहन व्यसनी होता व त्याने आई-बहिणीवर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला असे बोलले जात आहे. मात्र, ही रोहनच्या हत्येचे समर्थन करण्यासाठी नरवणेंकडून नंदाला असे बोलण्यास भाग पाडले असल्याची शक्यता नाकारता येत नाही, असे सांगितले जात आहे.
एसीपीसारख्या पदावरील अधिका-याला तरूणाच्या हत्येप्रकरणी अटक झाल्यानंतर साहेबांच्या रासलीलांची माहिती चवीने चर्चिली जात आहे. याबाबत कोणीही उघड बोलत नसले तरी नरवणे फारसा लोकप्रिय नव्हता व त्याचे वागणे नेहमीच रंगेल राहिल्याचे पोलिस कर्मचा-यांचे म्हणणे आहे. पत्नी आणि मुले असतानाही त्याने नंदासोबत लांज्यात विवाह केला होता. नंदाच्या समाधानासाठी नरवणेंने मंदिरात विवाह केला होता. त्याची अधिकृत कुठेही नोंद नव्हती. त्यामुळे तिला पत्नीचा दर्जा नावाला दिला होता. कारण नरवणेसोबत अनैतिक संबंध असल्याचे कळल्यानंतर नंदाला तिच्या डॉक्टर पतीने सोडून दिले होते. त्यामुळे नंदाने त्याच्याकडे तगादा लावला होता. पण नंदाकडे दोन फ्लॅट होते. त्यामुळे तिच्याकडून त्याला कसलाही त्रास व मागणी नव्हती. त्यामुळे त्याने नंदाबरोबर लग्न केले होते. याचबरोबर तो नंदाकडे तिच्या मुलां-मुलीसोबत यायचा, रहायचा. त्यामुळे नंदासोबत संबंध ठेवण्यास त्याला कोणताही अडथळा नव्हता. मात्र, मोठा झालेल्या रोहनला हळू-हळू हे खटकू लागले होते. त्यातूनच हा नंदासोबत रोहनचा वाद सुरु होता. त्यातच नंदाने अडथळा दूर नरवणेंच्या मदतीने रोहनचा काटा काढला.
नरवणेंचे नंदाशिवाय आणखी चार महिलांसोबत अनैतिक संबंध असल्याचे बोलले जात आहे. कुर्ला, शिवाजीनगर, घाटकोपर आदी ठिकाणी त्याची रासलीला चालायची. घाटकोपरमधील एका उत्तर भारतीय प्रसि्दध महिलेसोबत त्याचे संबंध होते. याची चर्चा सर्वत्र पोलिस दलात आहे. त्यामुळे पोलिस दलात नरवणेची प्रतिमा हा रंगेल माणूस अशी आधीच होती. नरवणेला दारू व सिगरेटचे व्यसन आहे. त्यातूनच रागीट व तामसी वृत्तीचा बनला. पोलिस दलात असल्याने पैशाची कमतरता नव्हती. त्यातच त्याला महिलांचा नाद जडला. एखादी महिला त्याच्या संपर्कात आली आणि त्याला पसंत पडली की तिच्यासाठी तो काहीही करायला तयार व्हायचा. याच्या रंगेलपणाची कहानी इकडे घरी पत्नी व मुलांना होती. तो दोन-दोन दिवस घरी जात नसे. मात्र, घरी मुलांना तो काहीही कमी पडू द्यायचा नाही. पण नरवणे पत्नी व मुलांच्या नजरेतून उतरला होता. ते त्याला फारसे गृहित धरत नव्हते.
नंदाचा फोन आला आणि त्याने रोहनचा काटा काढायचे ठरवले- नंदाने पोलिसांत जो जबाब दिला आहे तो मानला सत्य मानला तर, रोहनला अमली पदार्थांचे व्यसन होते. या नशेत तो आईला व बहिणीला त्रास द्यायचा. आईचे परपुरुषाशी असलेले संबंध त्याला खटकू लागले होते. त्यामुळे तो दारूच्या आहारी गेला होता. त्यातच तो तिला मारहाण करू लागला होता. नंदा त्यामुळे त्याला घाबरत होती व त्याच्यापासून त्रस्त असल्याने तिला सुटका हवी होती. गेली अनेक महिने हा प्रकार सुरु होता. घटनेच्या आदल्या दिवशी नंदाने नरवणेला रोहन त्रास देत असल्याबाबत फोन केला व त्याने रोहनचा बंदोबस्त करायचा निर्णय घेतला. घरी पत्नीला तो तीन दिवस येणार नसल्याचे सांगितले. हत्येच्या दिवशी नरवणे कामावरून थेट टिळकनगरला आला. येताना त्याने नेहरूनगरला दारूची बाटली व चाकू घेतला. सायंकाळपासून तो रोहन व त्याच्या मित्राला सोबत घेऊन दारू पित बसला होता. रात्री उशिरा मित्र घरी गेल्यानंतर नशेत असलेल्या रोहनला नरवणेने नंदाच्या मदतीने हत्या केली. नंदाने रोहनच्या डोक्यात फरशी घातली तर, नरवणेने त्याच्या पोटात चाकू खुपसला. त्यानंतर हा चाकू त्याने खिडकीतून फेकून दिला. त्यानंतर तो पहाटे घराबाहेर पडला. सकाळी दहापर्यंत तो घरी न जाता लोकलमध्ये फिरत राहिला. इकडे, सकाळी नंदाला दहा वाजता अटक झाल्याचे त्याला कळाले.