आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Rohit\'s Game Is Key Role For India Team In WC2015 Says Rohit Sharma\'s Parent

रोहित सलामीला चमकदार कामगिरी करून विश्वचषक जिंकून देईल: आई-वडिलांना विश्वास

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- रोहित यंदाच्या विश्वकरंडक स्पर्धेसाठी भारतीय संघाकडून सलामीला खेळेल व दमदार कामगिरी करून देशाला विश्वचषक जिंकून देण्यात मोलाची कामगिरी बजावेल असा विश्वास रोहितच्या आई-वडिलांनी व्यक्त केला आहे.
2011 साली भारतात झालेल्या विश्वकरंडक स्पर्धेत रोहितला संधी मिळाली नव्हती. त्यावेळी तो निराश झाला होता मात्र मोठी मेहनत त्याने आपली गुणवत्ता सिद्ध करून दाखवली आहे. तसेच विश्वकरंडक स्पर्धेसाठी प्रथमच संघात मिळाल्याने आम्ही कुटुंबिय खूपच आनंदीत आहोत अशी प्रतिक्रिया रोहितच्या वडिलांनी व्यक्त केली आहे.
मुंबईकर रोहित शर्माची 2015 विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धेसाठी भारतीय संघात सलामीवीर म्हणून निवड झाली आहे. पुढील महिन्यात ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड देशात होऊ घातलेल्या स्पर्धेसाठी आज मुंबईत भारतीय संघाची निवड करण्यात आली आहे. भारतीय संघात रोहितचा समावेश असल्याचे कळताच त्याच्या कुटुंबियांनी आनंद व्यक्त केला. एका वृत्तवाहिनीशी बोलताना रोहितचे वडील गुरुनाथ शर्मा आणि आई पोर्णिमा शर्मा यांनी आगामी विश्वचषकात चमकदार कामगिरी करेल असा विश्वास व्यक्त केला.
रोहितचे वडील गुरुनाथ शर्मा म्हणाले, रोहितची भारतीय संघात निवड झाल्याने आम्हाला आनंद झाला आहे. रोहित यंदाच्या विश्वचषकात चमकदार कामगिरी करेल व भारताला पुन्हा एकदा विश्वचषक जिंकून देण्यात महत्त्वाची कामगिरी बजावेल. यंदाच्या स्पर्धेसाठी त्याची निवड निश्चित होती. मात्र, 2011 साली भारतात झालेल्या विश्वकरंडक स्पर्धेत खेळण्याची त्याची इच्छा होती. मात्र, त्याचा संघात समावेश करण्यात आला नव्हता. त्यामुळे निराश झाला होता. 2011 साली तो केवळ 23 वर्षाचा होता. तुला भविष्यात निश्चित संधी मिळेल व तो प्रामाणिक मेहनत करीत राहा यश तुझ्या पाठीमागे येईल असे आपण त्याला सांगितल्याचे गुरुनाथ यांनी सांगितले.
निराश न होता रोहितने मोठी मेहनत घेत भारतीय संघात स्थान मिळवले. नुकतेच त्याने एकदिवसीय सामन्यात 264 धावांची विश्वविक्रमी खेळी केली आहे. त्यामुळे त्याचा आत्मविश्वास कमालीचा उंचावला असून, तो आगामी स्पर्धेत भारतीय संघाला विश्वचषक देण्यात मोलाची कामगिरी बजावणार आहे असे गुरुनाथ शर्मा यांनी सांगितले. रोहितची आई पोर्णिमा शर्मा यांनी रोहितच्या निवडीबाबत आनंद व्यक्त करीत तो उत्तम खेळ करेल असा विश्वास व्यक्त केला.