मुंबई/पुणे- रोमानियन महिला छायाचित्रकार माएला नोरोस या त्यांच्या 'अॅटलस ऑफ ब्यूटी' या प्रकल्पासाठी भारतात होत्या. दरम्यान त्यांनी देशभर भ्रमंती करून सुंदर महिलांचे काही फोटो टिपले आहेत. या फोटोंमध्ये काय आहे खास....
- या फोटो संग्रहात माएला यांनी पुणे, मुंबई व दिल्लीपर्यंतच्या महिलांचे सुंदर फोटो टिपलेत.
- संग्रहात सर्व फोटो रियल इमेज दाखवण्याचा त्यांनी प्रयत्न केला आहे.
- झोपडपट्टीत राहणा-या महिलांपासून बॉलीवुडच्या फीमेल स्टार्सचे फोटो त्यांनी घेतले आहेत.
- नोरोस यांनी हे फोटो मुंबई, पुणे, नाशिक, दिल्ली, पुष्कर, अमृतसर व वाराणसी येथे घेतलेत.
- नोरोस या प्रकल्पासाठी सुमारे 6 महिने भारतात होत्या.
- वेगवेगळ्या क्षेत्रातील 200 हून अधिक महिलांचे फोटो त्यांनी टीपले आहेत.
- याबाबत नोरोस म्हणाल्या, भारतात खूप सुंदर महिला आहेत. त्यांना आव्हानं आणि भेदभावाचा सामना करावा लागतो. या महिला शक्ती आणि सौंदर्याचे असाधारण उदाहरण असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.
- या महिला त्यांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी मेहनत घेतात. पण जग त्यांना ओळखू शकत नाही.
कोण आहेत माएला नोरोस?
- रोमानियाच्या बुखारेस्ट येथील रहिवाशी असलेल्या 30 वर्षीय माएला फोटोग्राफर आहेत.
-त्या मागील 3 वर्षांपासून जगातील विविध देशांमध्ये भ्रमंती करत आहेत.
- त्या वयाच्या 17 व्या वर्षापासून फोटोग्राफी करत आहेत. त्यांचे वडील पेंटर आहेत.
- आपले छंद पूर्ण करण्यासाठी त्या विविध क्षेत्रांमध्ये काम करतात.
- एक प्रवाशी म्हणून जग भ्रमंती करताना त्यांना विविधतेचे महत्त्व कळले.
पुढील स्लाइड्सवर पाहा, माएला नोरोस यांनी कैद केलेले भारतीय महिलांचे काही खास PHOTOS...