आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कधी काळी घरोघरी केबल बसवायचे, आज आहे अब्जावधी कंपनीचा मालक

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अभिनेत्री कॅटरिना कैफसोबत रॉनी स्क्रूवाला... - Divya Marathi
अभिनेत्री कॅटरिना कैफसोबत रॉनी स्क्रूवाला...
मुंबई- बॉलिवुडचे चित्रपट असो, मालिका असो की टीव्ही चॅनल्स UTV ग्रुपचे नाव तुम्ही पाहिले, ऐकले नक्कीच असेल. हा ग्रुप आज भारतातील सर्वात मोठा मीडिया ग्रुपपैकी एक आहे. या ग्रुपला शून्यातून शिखरापर्यंत नेण्यात अर्थातच ग्रुपचे संस्थापक आणि मॅनेजिंग डायरेक्टर रॉनी स्क्रूवाला यांना जाते. कधी काळी मुंबईत केबल ऑपरेटरचे काम करणा-या रॉनीने 1990 मध्ये यूटीव्ही कम्युनिकेशन (यूनायटेड टेलीव्हिजन सॉफ्टवेअर कम्युनिकेशन प्रायवेट लिमिटेड) नावाची कंपनी सुरू केली जिची आज अब्जावधी रूपयांची उलाढाल आहे.
आज रॉनी स्क्रूवाला यांचा वाढदिवस आहे. यानिमित्ताने आम्ही तुम्हाला रॉनी स्क्रूवाला यांच्याबाबतीत काही माहित नसलेली माहिती सांगणार आहोत....

शॉर्ट फिल्म आणि जाहिरात विश्वापासून केली होती सुरूवात-
यूटीव्हीची सुरुवात करण्यापूर्वी रॉनी स्क्रूवाला हे मुंबईत केबल ऑपरेटर होते. केबल व्यवसायातून पैसा कमवून रॉनीनी शॉर्ट फिल्म आणि जाहिरात विश्वास पाऊल ठेवले. ज्यात त्यांना मोठे यश आले. काही काळातच त्यांचा व्यवसाय वाढत गेला व त्यांनी पुढे यूटीव्ही पिक्चर्सची स्थापना केली.
कबड्डी टीमचे मालक आहेत रॉनी-
प्रो कबड्डी लीगमध्ये खेळणारी यूमुम्बा (मुंबई) कबड्डी टीमचा रॉनी सहमालक आहे. त्याची टीम पहिल्या कबड्डी लीगमध्ये उपविजेती ठरली होती.
द वॉल्ट डिज्नीशी भागीदारी-
फेब्रुवारी 2012 मध्ये द वॉल्ट डिज्नी कंपनीने यूटीव्हीला टेक ओवर केले. ज्यानंतर रॉनी कंपनीचे मॅनेजिंग डायरेक्टर बनले तर सिद्धार्थ रॉय कपूर यांना सीईओपदी नियुक्त केले गेले. सध्या महाराष्ट्रात रॉनी शेयर नावाची एक NGO ही चालवतात. जी ग्रामीण भागाच्या विकासासाठी काम करते.
पुढे स्लाईड्सच्या माध्यमातून पाहा, रॉनी स्क्रूवाला यांची निवडक छायाचित्रे...
बातम्या आणखी आहेत...