आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चला साहित्य नगरीचा फेरफटका मारायला, साहित्यप्रेमींसाठी खास सफर

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - पस्तीस फुटांची भव्य लेखणी, नामवंत साहित्यकांच्या मूर्ती, साहित्य पार्क अशा नानाविविध संकल्पनांसह डोंबिवलीत ९० व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनासाठी साहित्य नगरी सजवण्यात आली आहे. तरुणांसाठी खास सेल्फी पार्क तयार करण्यात आले असून, याठिकाणी महाराष्ट्रातील ज्येष्ठ साहित्यिकांचे विविध पुतळे आहेत, त्यांच्याबरोबर तरुणांना सेल्फी घेता येईल.कला दिग्दर्शक संजय धबडे यांच्या संकल्पनेतून ही साहित्य नगरी साकारली आहे. 
 
अशी आहे साहित्य नगरी
> गणपती, ज्ञानेश्वर आणि तुकाराम यांचे सुबक मंदिर
> सेल्फीची आवड असलेल्यांसाठी खास सेल्फी पार्क तयार करण्यात आला आहे. 
> सेल्फी पार्कमध्ये ३५ फूटाची लेखणी लक्ष वेधून घेते. ही लेखणी म्हणजे एक मनोरा असून त्याच्या पहिल्या मजल्यापर्यंत शिडीने जाऊन साहित्य रसिक फेरी मारू शकतात. 
> साहित्य पार्कमध्ये पू.ल. देशपांडे, आचार्य अत्रे, शांता शेळके, बहिणाबाई चौधरी, शं.ना. नवरे यांच्या मूर्त्या आहेत. 
> पार्कमध्ये फेरफटका मारताना रसिकांना या साहित्यिकांबरोबर सेल्फी काढता येऊ शकेल. 
> साहित्य संमेलनात डोम पद्धतीच्या मंडपाची उभारणी करण्यात आली आहे. 
> २५० फूट बाय ४०० फूट आकाराच्या मुख्य मंडपात बारा हजार साहित्य प्रेमी बसतील अशी व्यवस्था आहे. 
> ग्रंथ दालनात ३५० स्टॉल असतील. दोन कवी कट्ट्यांसाठी दोन मंडप आहेत. 
> साहित्य या संकल्पनेवर आधारीत उभारण्यात आलेला भव्य दिव्य सेट हे यंदाचे खास आकर्षण आहे.
 
पुढील स्लाइड्सवर पाहा, साहित्य नगरीचे PHOTO अखेरच्या स्लाइडवर पाहा VIDEO
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...