आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आधी ख्रिश्‍चन, नंतर हिंदु परंपरेनुसार पार पडले होते हे लग्न; थेट ब्रिटनहून आली होती नवरी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- प्रसिद्ध उद्योजक दीपक पारेख यांचा आज (18 ऑक्‍टोबर) वाढदिवस. या अनुषंगाने आम्‍ही आपल्याला पारेख यांचा मुलगा सिद्धार्थ याच्‍या शाही लग्‍नाची माहिती देत आहोत. देशातील एका मोठ्या लग्‍नसोहळ्यापैकी एक ठरलेला हा सोहळा अविस्‍मरणीय होता. त्‍या आठवणींना हा खास उजाळा...

एचडीएफसी बँकचे अध्‍यक्ष दीपक पारेख यांचा मुलगा सिद्धार्थ याचे लग्‍न राजस्थानच्‍या मेहरानगडमध्‍ये झाले. हे लग्‍न एवढे भव्‍य होते की, यातील पाहुणे चार्टर प्लेनने आले होते. सिद्धार्थ याची नवरी क्लेरी ओ नेल ब्रिटनची रहिवाशी होती. लग्‍नासाठी तिचे नातेवाईक अमेरिका आणि ब्रिटनमधून येथे आले होते. हे लग्‍न आधी ख्रिश्‍चन आणि नंतर हिंदु परंपरेनुसार झाले होते.

दिग्गज मंडळी झाले सहभागी... तीन दिवस चालले कार्यक्रम
या लग्‍नसोहळ्यामध्‍ये टाटा ग्रुपचे माजी अध्‍यक्ष सायरस मिस्त्री, रिलायन्स ग्रुपचे मुकेश अंबानी, एडीएजी ग्रुपचे अनिल अंबानी, माजी केंद्रीय मंत्री प्रफुल्ल पटेल, जेट एयरवेजचे नरेश गोयल, शिवसेना सुप्रीमो उद्धव ठाकरे यांच्‍यासह अनेक प्रसिद्ध व्‍यक्‍ती सहभागी झाल्‍या होत्‍या. या शिवाय 150 पेक्षा अधिक देशी-विदेशी पाहुणे विशेष विमानाने जोधपूरला आले होते.

पुढील स्लाइड्सवर पाहा कोण कोण झाले होते सहभागी...
बातम्या आणखी आहेत...