आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

एका चुकीमुळे वयोवृद्ध प्रवासी पोहोचला होता मृत्यूच्या दाढेत, कॅमेर्‍यात कैद झाला चमत्कार!

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- धावत्या ट्रेनमध्ये चढताना किंवा उतरताना होणार्‍या अपघाताच्या घटना थांबत नसताना एक घटना समोर आली आहे. मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवर ही घटना घडली. वयोवृद्ध प्रवासी धावत्या ट्रेनमध्ये चढताना प्लॅटफार्म आणि ट्रेनच्या गॅपमध्ये सापडला. तितक्यात प्लॅटफॉर्मवर तैनात एका आरपीएफ कॉन्स्टेबलने त्याचा हात पकडून त्याला बाहेर काढले. सुदैवाने प्रवाशी मृत्यूच्या दाढेतून परत आला. ही घटना कॅमेर्‍यात कैद झाली आहे.

 

ट्रेनमधून असा पडला प्रवासी...
- सूत्रांनुसार, काल (रविवार)  प्लेटफार्मवर विदर्भ एक्सप्रेस रवाना झाली तेव्हा जगन्नाथ उन्हाळे (62) या वयोवृद्ध प्रवाशाने ट्रेनमध्ये चढण्याचा प्रयत्न केला.
- ट्रेनचा वेग तसा जास्त होतो. जगन्नाथ उन्हाळे यांचा पाय घसरला आणि ते प्लेटफार्म आणि ट्रेनच्या गॅपमध्ये पडले.
- परंतु त्यांनी गेटचे हँडल सोडले नाही. ते दूरपर्यंत प्लॅटफॉर्मला घासतच गेले. तितक्यात प्लॅटफार्मवर ड्यूटीवर तैनात आरपीएफ कांस्टेबल सचिन सबने हे जगन्नाथ उन्हाळे यांच्या मदतीला धावून गेले.

- त्यांनी प्रसंगावधान राखून प्लॅटफार्मवर धावत जाऊन जगन्नाथ उन्हाळे यांना बाहेर काढले.

 

पुढील स्लाइड्‍सवर क्लिक करून पाहा... संबंधित घटनेचा व्हिडिओ आणि फोटो...

बातम्या आणखी आहेत...