आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एका चुकीमुळे मृत्यूच्या अगदी जवळ होता तरुण; क्षणात चमत्कार होताच मिळाले जीवदान!

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- इतके अपघात होतात तरी धावत्या रेल्वेत चढणारे आणि उतरणार्‍यांची संख्या कमी होत नाही आहेत. मुंबईतील कुर्ला रेल्वे स्टेशनवर आणखी एक अपघात झाल्याचे समोर आले आहे. धावती लोकल ट्रेनमध्ये चढताना एका तरुणाचा तोल जाऊन तो ट्रेन आणि प्लॅटफार्ममधील गॅपमध्ये पडला. त्याच्या सुदैवाने तिथे रेल्वे सुरक्षा बलाचे (आरपीएफ) दोन जवान उपस्थित होते. ते त्याच्या मदतीला धावून आले आणि त्या तरुणाचे प्राण वाचले.

कशी घडली दूर्घटना...?
- कुर्ला आरपीएफनुसार, ही घटना शनिवारची आहे. शहरातील कोपरखैर भागात राहाणारे संजय कोलते (30) यांना कुर्ल्याहून कोपरखैर येथे जायला निघाले होते.
- संजय कोलते कुर्ला स्टेशनवर पोहोचले, तितक्यात लोकल ट्रेन निघाली होती. संजय यांनी धावत पळत ट्रेनमध्ये चढण्याचा प्रयत्न केला. पण त्यांचा तोल जाऊन ते प्लॅटफार्म आणि ट्रेनच्या मधील गॅपमध्ये पडले.
- गॅपमध्ये पडल्यानंतर ट्रेन त्यांना  घासतच काही अंतरापर्यंत घेऊन गेली. तितक्यात ड्यूटीवर तैनात आरपीएफ कॉन्स्टेबल प्रदीप गीते आणि एस.के कुशवाह हे त्यांच्या मदतीला धावून गेले.
- दोघांनी संजय कोलते याला सुखरुप बाहेर काढले.
- संजयसाठी हे दोन्ही कॉन्स्टेबल देवदूत म्हणूनच आले होते.
- संजय कोलते हे बेस्टमध्ये बस कंडक्टर पदावर कार्यरत आहे.

गॅप जास्त असल्याने वाचला संजय...
- ही संपूर्ण घटना कुर्ला स्टेशनवरील सीसीटीव्ही कॅमेर्‍यात कैद झाली आहे. ट्रेन आणि प्लॅटफॉर्ममध्ये अंतर जास्त असल्याने संजयचा जीव वाचला.

दरम्यान, मुंबई लोकल ट्रेनखाली येऊ दरवर्षी 3000 हून अधिक लोकांनी आपला जीव गमावतात.

पुढील स्लाइडवर क्लिक करून पाहा.. घटनेशी संबंधित फोटो...
 
बातम्या आणखी आहेत...