आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

जीव देण्यासाठी युवक रेल्वे रुळावरुन पळाला येणाऱ्या लोकलच्या दिशेने; त्यानंतर घडले असे काही

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बँग चोरीला गेल्याने वैतागलेला संजय थेट रुळावरच जाऊन उभा राहिला. - Divya Marathi
बँग चोरीला गेल्याने वैतागलेला संजय थेट रुळावरच जाऊन उभा राहिला.

मुंबई- कुर्ला स्थानकावर शनिवारी एक विचित्र प्रकार घडला. बॅग चोरीला गेल्यामुळे जीव देण्याचा प्रयत्न करणाऱ्या एका तरुणाचे प्राण आरपीएफच्या जवानाने वाचवले. ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. या तरुणाचे सुमारे 2 तास समुपदेशन करण्यात आले. 

 

 

नेमके काय घडले?]

 

- सोलापूर येथील संजय पाटील नावाचा हा युवक काही कामानिमित्त मुंबईत आला होता. तेथे त्याची बँग चोरीला गेली. त्याबाबत फिर्यादही दिली पण बँग चोरीला गेल्याने तो अस्वस्थ होता.
- त्याने अचानक कुर्ल्यातील प्लॅटफॉर्म नंबर एकवर उडी मारली आणि सीएसटीहून अंबरनाथकडे येणाऱ्या फास्ट लोकलच्या दिशेने तो चालत गेला. मोटरमननं तत्परता दाखवून इमर्जन्सी ब्रेक लावल्यामुळे त्याचे प्राण बचावले.

- लोकल युवकापासून अवघ्या 4 ते 5 फूट अंतरावर थांबली. त्यानंतर स्टेशनवरील प्रवासी आणि आरपीएफ जवानांनी त्याला प्लॅटफॉर्मवर खेचून आणले.

- संजय कोल्हापूरला जात असताना त्याची बॅग चोरीला गेली. त्याने कुर्ला जीआरपीमध्ये तक्रार दाखल केली. मात्र झालेल्या प्रकाराला कंटाळून त्याने हे पाऊल उचलल्याचे पोलिसांनी सांगितलं. या सर्व प्रकारानंतर त्याला कुटुंबीयांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

 

 

पुढील स्लाईडवर आणखी फोटो आणि माहिती

 

बातम्या आणखी आहेत...