आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • RPI Asks Kejriwal To Stop Anti Media Remarks News In Marathi

केजरीवालांना आम्हीच तुरूंगात टाकू : आठवले

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - आम आदमी पार्टीचे नेते अरविंद केजरीवाल त्यांना मोठे करणार्‍या माध्यमांच्याच मुळावर उठले आहेत. केंद्रात रालोआचे सरकार सत्तेवर आल्यास केजरीवाल यांना बेताल वक्तव्याचा हिशेब चुकता करावा लागेल. आम्हीच त्यांना तुरुंगात टाकू, असा सज्जड दम रिपाइंचे राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले यांनी रविवारी पत्रकार परिषदेत दिला. आम आदमी म्हणवता, मग आम आदमीला दहा हजारांचे जेवण कसे परवडते, अशा शब्दांत आठवले यांनी केजरीवाल यांच्या पार्टीची खिल्ली उडवली. केजरीवालांनी काशीतून उभे राहावे आणि स्वत:ची काशी करून घ्यावी, असे आठवले म्हणाले. आपचा आरक्षणाला विरोध नाही, असे आता केजरीवाल सांगत आहेत. मात्र, दलित, आदिवासी आणि अल्पभूधारक शेतकर्‍यांसाठी आपकडे कोणताही ठोस कार्यक्रम नाही. संविधान न मानणार्‍या आपला मतदार थारा देणार नाहीत, अशी टीकाही आठवले यांनी केली.