आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उद्धव यांच्याकडून मला दिवाळी गिफ्ट नक्की मिळेल- रामदास आठवले

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- गेल्या दोन वर्षापासून युतीत सामील झालेल्या आरपीआय पक्षाचे अध्यक्ष रामदास आठवले यांनी आपल्याला महायुतीकडून राज्यसभेची खासदारकी मिळणार असल्याचे स्पष्ट संकेत आज दिले. रविवारी आठवले यांनी मातोश्रीवर जावून उद्धव यांची भेट घेतली. सुमारे तासभर चर्चा केल्यानंतर बाहेर पडलेल्या आठवले यांनी सांगितले की, महायुतीकडून आपल्याला राज्यसभेची उमेदवारी मिळेल. तसेच उद्धव यांच्याकडून आपल्याला दिवाळीचे गिफ्ट नक्की मिळेल, असा विश्वास व्यक्त केला.
मागील आठवड्यात महायुतीच्या समन्वय समितीने आठवले यांना राज्यसभेची उमेदवारी देण्यात यावी असा प्रस्ताव आपापपल्या पक्षाच्या नेत्यांकडे केली होती. त्यानंतर उद्धव यांची आठवले यांनी आज दिवाळीनिमित्त भेट घेतली. त्यावेळी राज्यसभेच्या जागेबाबत चर्चा झाल्याची शक्यता आहे. त्यामुळेच ठाकरेंच्या भेटीनंतर आठवले यांनी आपल्याला उद्धव यांच्याकडून दिवाळी भेट नक्की मिळेल, असे म्हटले आहे.