आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • RPI Protest Demanding That BR Ambedkar\'s Memorial Be Constructed In The Indu Mill Compound

PHOTOS: जवखेडा व इंदू मिलप्रकरणी मुंबईत 15 हजार दलितांनी काढला निषेध मोर्चा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- इंदू मिलच्या जागी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारक उभारण्यास सुरुवात करावी या मागणीसह जवखेडे तिहेरी दलित हत्याकांडप्रकरणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (रामदास आठवले गट) आणि भारिप-बहुजन महासंघातर्फे मुंबईत आज वेगवेगळ्या ठिकाणी महामोर्चा काढण्यात आला. या मोर्चात राज्यातील सुमारे 15 हजारांहून अधिक दलित बांधव सहभागी झाले होते.
मुंबईतील इंदू मिलच्या जागेवर महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे आंततराष्ट्रीय स्मारक उभारण्यास लागलीच सुरुवात करावी अन्यथा 6 डिसेंबरनंतर तीव्र भूमिका घेऊ असा इशारा यावेळी देण्यात आला. याचबरोबर जवखेडा दलित हत्याकांड प्रकरणाचा तपास लवकरात लवकर लावा अशी मागणीही करण्यात आली. या मोर्चात खासदार रामदास आठवले यांच्यासह अनेक दलित संघटनाचे पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते.
पुढे पाहा या मोर्चातील छायाचित्रे...