आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आठवलेंची ऐक्य परिषद चौथ्यांदा स्थगित

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - अहमदनगर िजल्ह्यातील कोपर्डी बलात्कार घटनेतंतर राज्यात दलित आणि मराठा समाजात उद्भवलेला तणाव कमी व्हावा यासाठी रिपाइंच्या वतीने आयोजित केलेल्या दलित-मराठा ऐक्य परिषदेस मराठा समाजातील नेत्यांचा प्रतिसाद िमळत नाही. त्यामुळे केंद्रीय सामािजक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांना चौथ्यांदा दलित- मराठा ऐक्य परिषद पुढे ढकलावी लागली आहे.
मराठा समाजाकडून आरक्षण आणि अॅट्राॅसिटीत बदल करण्याच्या मागणीसाठी प्रत्येक िजल्ह्यात मराठा क्रान्ती मोर्चे काढले जात आहेत. या मोर्चांना प्रतिमोर्चे काढून दलितांकडून प्रत्युत्तर दिले जाईल, असा इशारा सुरुवातीला आठवले
यांनी िदला होता. मात्र त्यानंतर त्यांनी आपल्या भूमिकेत बदल करत दोन्ही समाजातील तणाव दूर व्हावा, यासाठी शिर्डी येथे ७ आॅक्टोबर रोजी दलित- मराठा ऐक्य परिषद घेण्याचे जाहीर केले.
परिषदेची ७ तारीख बदलून ती १३ आॅक्टोबर करण्यात आली. १३ तारीख बदलून १९ आॅक्टोबर करण्यात आली. आता १९ आॅक्टोबर रोजीसुद्धा ही परिषद होणार नाही. परिषदेची तारीख नंतर कळवली जाईल. काही तांत्रिक कारणांमुळे परिषदेची तारीख बदलण्यात आली आहे, असे आठवले म्हणाले. परिषदेला मराठा आणि दलित नेत्यांना िनमंत्रित करण्यात आले होते. मात्र मराठा नेते परिषदेस
येण्यास तयार नाहीत, त्यामुळे परिषदेची चौथ्या वेळी तारीख बदलावी लागली, कदाचित आता ही परिषद होणारसुद्धा नाही, अशी माहिती रिपाइंच्या सूत्रांनी िदली.
यांना होते निमंत्रण
भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, केंद्रीय राज्यमंत्री सुभाष भामरे, शिक्षणमंत्री विनोद तावडे, माजी मुख्यमंत्री नारायण राणे, विरोधीपक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार छत्रपती संभाजी, काँग्रेसचे माणिकराव ठाकरे, बाळासाहेब थोरात, यशवंत गडाख, मंत्री रामदास कदम, खासदार शिवाजीराव आढळराव पाटील, राज्यमंत्री अर्जून खोतकर, मंत्री गुलाबराव पाटील, शिवेंद्रराजे भोसले, आमदार विनायक मेटे, मराठा सेवा संघाचे संस्थापक पुरुषोत्तम खेडेकर, शिर्डी संस्थानचे अध्यक्ष सुरेश हावरे, संभाजी ब्रिगेडचे माजी प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड आदी निमंत्रीत होते. मराठा नेत्यांबरोबरच दलित समाजातील माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे, सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले, राज्यमंत्री िदलीप कांबळे, शिवसेना खासदार सदाशिव लोखंडे, मनसे नेते बाळा नांदगावकर, माजी मंत्री लक्ष्मणराव ढोबळे यांचाही िनमंत्रीतांमध्ये समावेश होता.
बातम्या आणखी आहेत...