आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गृहखात्यावर आबांसारखा देवेंद्रांचा अंकुश नाहीच; स्मिता पाटील यांची टीका

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- ‘माजी गृहमंत्री आर.आर.पाटील यांचा गृह खात्यावर अंकुश होता. राज्यात एखादी महत्त्वाची घटना घडली की ते तत्काळ तिथे जात होते. विद्यमान मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा मात्र गृह विभागावर वचक दिसत नाही. राज्यात कायदा-सुव्यवस्था बिघडली असून महिलांवरील अत्याचारांच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. हे योग्य नसून राज्याचे गृहमंत्रिपद हे स्वतंत्र व्यक्तीकडेच असले पाहिजे,’ अशी टीका राष्ट्रवादी युवती संघटनेच्या नूतन अध्यक्षा स्मिता अार. पाटील यांनी बुधवारी केली. स्मिता या अार. अार. पाटील यांच्या कन्या अाहेत.

पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्या कन्या ‘राष्ट्रवादी’च्या खासदार सुप्रिया सुळे यांच्या नेतृत्वाखाली राज्यात राष्ट्रवादी युवत काॅंग्रेस या संघटनेची वाटचाल सुरु अाहे. स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या ताेंडावर त्यांनी अाता या संघटनेची धुरा स्मिता यांच्याकडे साेपवली. अापल्या निवडीनंतर पत्रकारांशी बाेलताना स्मिता पाटील म्हणाल्या, ‘आबांचा कारभार पारदर्शी होता. राज्यात मोठ्या संख्येने असलेल्या ग्रामीण भागातील जनतेला त्यांचा आधार वाटायचा. मुख्य म्हणजे पक्षाने सोपवलेले प्रत्येक काम त्यांनी अतिशय समर्थपणे सांभाळले होते.

ग्रामविकासप्रमाणे गृह विभागाचा कारभार उत्तमरीत्या सांभाळताना अाबांनी सर्वसामान्यांना न्याय दिला. मी आबांची स्वच्छ आणि करारी प्रतिमा सांभाळण्याचा प्रयत्न करेन,’ असेही त्या म्हणाल्या.

‘कोपर्डीसारख्या घटनांना पायबंद घालायचा असेल तर जिल्हा पोलिस यंत्रणेकडून भरारी पथक स्थापन करून राज्यातील महिलांना संरक्षण दिले पाहिजे. शरद पवार यांच्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये महिलांना पन्नास टक्के आरक्षण मिळाले, याचा राज्यातील तरुणी तसेच महिलांना अभिमान वाटतो. सुशिक्षित महिलांनी माेठ्या संख्येने राजकारणात यावे, यासाठी मी सतत प्रयत्न करणार आहे. महिला सबलीकरणासाठी हा उत्तम पर्याय असल्याचे मला वाटते,’ असे स्मिता यांनी सांगितले.

बातम्या आणखी आहेत...